

पिंपरी :प्रभाग क्रमांक 14 काळभोर नगर मधील टीव्हीएस शोरूमच्या समोर आणि टीव्हीएस कंपनीच्या सर्विस सेंटर मध्ये येणाऱ्या असंख्य टू व्हीलर आणि फोर व्हीलर काळभोर नगर मधून प्रवेश करणाऱ्या रस्त्याला दुतर्फा सगळीकडे लावल्या जात होत्या. काळभोर नगर मध्ये येणाऱ्या सर्व लोकांना याचा प्रचंड मोठा अडथळा आणि त्रास होत होता. त्याचबरोबर या शोरूम मध्ये येणाऱ्या गाड्यांचे मटेरियल खाली करण्यासाठी उभे राहणारे चार चाकी टेम्पो हे देखील याच रस्त्यावर उभे राहून रहदारीला अडथळा निर्माण करत होत्या. कित्येक वेळा काळभोर नगर मधील नागरिकांच्या गाड्यांना शोरुम वाल्यांचे हे टेम्पो खाली होईपर्यंत स्वतःच्या गाड्या एकाच जागेवर थांबवून टेम्पो निघण्याची वाट पाहावी लागत असे. अनेक दिवसांपासून टीव्हीएस शोरूम समोरील या पार्किंगने संपूर्ण काळभोर नगरचे नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले होते. अशा वेळी अनेकदा नागरिकांचे येथील टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाल्यांशी भांडणे देखील झाली आहेत. अशातच आज माझ्यासोबत देखील असाच प्रकार घडला.

आणि मग मात्र माझी सटकली. या प्रचंड मानसीक त्रासामुळे माझ्यातला रुद्र अवतार जागा झाला. संपूर्ण शोरूम वाल्यांना राजू दुर्गे स्टाईल मध्ये घोडा लावून टाकला. पार्किंग केलेल्या सगळ्या गाड्या लाथेने ढकलून हाताने सरकवून पाडून टाकल्या. यापुढे या परिसरात कोणत्याही टू व्हीलर लागता कामा नये याचा आदेशच या टीव्हीएस शोरूमच्या सर्व मॅनेजर्स आणि वाचमेन यांना दिला. त्याप्रमाणे दररोज दोन वाचमेन गेटच्या बाहेर टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्या या ठिकाणी पार्किंग करू नये हे सांगण्यासाठी कायम स्वरुपी ठेवण्याचे टीव्हीएस शोरूम वाल्यांना सांगितले. त्यांनी ते ताबडतोब मान्य देखील केले. त्याचबरोबर काळभोर नगरच्या या आत मध्ये येणाऱ्या रोडला नो पार्किंगचे बोर्ड देखील टीव्हीएस शोरूम यांच्याकडूनच लावले जाणार आहेत. यासह उभ्या राहणाऱ्या टू व्हीलर च्या ठिकाणी नो पार्किंगचे खांब आणि साखळी जाळ्या देखील लावल्या जाणार आहेत. याची संपूर्ण जबाबदारी टीव्हीएस शोरूम नीच घ्यावयाची आहे असे त्यांना ठणकावून बजावले आणि इथल्या अवास्तव टू व्हीलर फोर व्हीलर वाल्यांच्या पार्किंग अतिक्रमानातून काळभोर नगर मधील नागरिकांची सुटका करून घेतली.