पिंपरी चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

दिशा सोशल फाऊंडेशनचे  २० व्या वर्षात पदार्पण

Spread the love

 

पिंपरी(लोकजागृती) :६ एप्रिल २००६…. या गुढीपाडव्याच्या शुभदिनी दिशा सोशल फाऊंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना झाली. आज रविवारी, अर्थात ६ एप्रिल २०२५ रोजी संस्थेने २०व्या वर्षात पदार्पण केले आहे.

काहीतरी चांगले काम करू, या भावनेने आम्ही काही तरूण मित्रांनी एकत्र येऊन २० वर्षापूर्वी या फाऊंडेशनची स्थापना केली. पुढे एकेक करत अनेकजण दिशा फाऊंडेशनशी जोडले गेले. दिशाचा विस्तार होत गेला. सर्वांच्या पुढाकाराने, सामुहिक प्रयत्नांतून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आले, तुडुंब गर्दी खेचणारे उत्तमोत्तम कार्यक्रमही झाले. दिशाची व्याप्ती, लोकप्रियता वाढत असतानाच फाऊंडेशनची महती ,राज्यस्तरीय पातळीवर पोहचली.

    दिशा सोशल फाऊंडेशनच्या आतापर्यंतच्या प्रवासात अनेक दिग्गजांनी दिशाच्या व्यासपीठावर हजेरी लावली आहे. प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, अमर साबळे, गजानन बाबर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, प्रशासकीय सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे, डॉ. श्रीकर परदेशी, तेव्हाचे पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह, कृष्णप्रकाश, अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दिलीप बंड, राजीव जाधव, आशिष शर्मा, प्रसिध्द व्याख्याते नितीन बानुगडे पाटील, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, डॉ. सदानंद मोरे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. रामचंद्र देखणे, लक्ष्मीकांत देशमुख, प्रविण दवणे, रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, सुधीर गाडगीळ, विठ्ठल वाघ, संभाजी भगत, डॉ. उर्जिता कुलकर्णी, रमा मराठे, इंदुमती जोंधळे, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, असीम सरोदे, बाळासाहेब अनास्कर, यजुर्वेद महाजन,

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, जॉनी लीव्हर, भरत जाधव, सिध्दार्थ जाधव, शंतनू मोघे, देवदत्त नागे, संकर्षण कऱ्हाडे, प्रख्यात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, समर नखाते, सचिन गोस्वामी, सचीन मोटे,, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी,, केदार शिंदे, प्रविण तरडे, भाऊराव कऱ्हाडे, कार्तिक केंढे, राज काझी, निर्माते विश्वास जोशी, राहुल भंडारे,, अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, मुक्ता बर्वे, पर्ण पेठे, कादंबरी कदम, प्रियदर्शिनी इंदलकर, सोनाली कुलकर्णी (ज्यु.) अशी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची बरीच मोठी यादी आहे.

दिशा फाऊंडेशनच्या वतीने २०१७ पासून दिशा दिवाळी फराळ हा आगळा वेगळा उपक्रम सुरू करण्यात आला, तो लक्षवेधी ठरला आहे. स्थानिक आमदार-खासदारांसह राजकीय पक्षांचे बडे नेते, प्रसिध्द अभिनेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी दिवाळी फराळच्या निमित्ताने एकत्र येतात. कधी न होणाऱ्या भेटीगाठी या ठिकाणी होतात. विचारांचे आदान-प्रदान होते. गप्पांचे फड रंगतात. या आनंददायी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मान्यवरांची संख्या दरवर्षी वाढते आहे.

दिशा फाऊंडेशनच्या उभारणीत तसेच, प्रगतीच्या वाटेत बऱ्याच जणांचा हातभार लागलेला आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेकांचे सहकार्य लाभलेले आहे. गेल्या २० वर्षात लाभलेले थोरामोठ्यांचे आशिर्वाद यापुढील वाटचालीतही कायम राहतील,, याची खात्री आहे.

बाळासाहेब जवळकर (पत्रकार- लेखक)

अध्यक्ष, दिशा सोशल फाऊंडेशन

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button