भक्ती शक्ती आणि भोसरी येथे मतदार जनजागृती कार्यक्रम


पिंपरी(लोकजागृती ) :-सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २1०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

२३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी निगडी येथील भक्ती शक्ती उद्यान येथे मतदारांना येत्या निवडणुकीत मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच उपस्थित मतदारांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या निर्देशानुसार, उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेच्या वतीने स्वतंत्र स्वीप कक्ष स्थापित करण्यात आला असून त्याद्वारे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. भक्ती शक्ती येथील कार्यक्रमात मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, किशन केंगले, लिपिक अभिजित डोळस यांच्यासह सचिन महाजन, पियुष घसिंग, श्रेयस जाधव यांच्या उपस्थिती मोठ्या संख्यने नागरिकांनी मतदानाची शपथ घेतली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा नागरिकांनी निर्धार केला.
महापालिकेच्या स्वीप कक्षामार्फत आज भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे खाजगी शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन सोहळ्यात उपआयुक्त राजेश आगळे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व पालकांना मतदान करण्याबाबत शपथ दिली. तसेच मतधिकाराचे महत्व पटवून सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.