पिंपरी चिंचवड

एचए हायस्कूलची प्रीत पाटील आणि मिसबा शेख याचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश 

आठवीचा एकूण निकाल ५२ टक्के लागला.

Spread the love

 

 

पिंपरी, पुणे (दि. ९ जुलै २०२४) पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या प्रीत पाटील (इंग्रजी माध्यम, इयत्ता पाचवी) राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत २९४ पैकी २७२ गुण प्राप्त करून राज्यस्तरीय शहरी गुणवत्ता यादीत दहावे स्थान, पुणे जिल्हा शहरी गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक आणि इंग्रजी माध्यमातून पुणे विभागातून प्रथम क्रमांक त्याने पटकावत उल्लेखनीय यश प्प्त केले.

मिसबा शेख (इयत्ता पाचवी) हिने २२४ गुण प्राप्त करून शहरी विभाग गुणवत्ता यादीत ३१३ वा क्रमांक मिळवला आहे. हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माध्यमिक विभाग पिंपरी प्रशालेतील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण ३३ विद्यार्थी पात्र ठरले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ५३.४५ टक्के लागला. इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण २८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत व आठवीचा एकूण निकाल ५२ टक्के लागला. मुख्याध्यापिका अनघा डांगे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय भोसले, पर्यवेक्षिका मनीषा कदम, शालासमिती अध्यक्ष खेमराज रणपिसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले .

————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button