पुणेमनोरंजन

छावा चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचं म्हणत गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी आता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

मुघलांना वाट दाखवल्याचा पुरावा द्या, गणोजी शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप; राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा

Spread the love

 

पुणे(लोकजागृती ): दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा छावा चित्रपट सध्या देशभर गाजतोय. या सिनेमातील कथानकावर आता शिर्के घराण्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघलांना मदत केली,त्यांनी स्वराज्याशी गद्दारी केल्याचं सिनेमात दाखवण्यात आलं आहे. यावर आता शिर्के घराण्यातील वंशजांकडून आक्षेप घेतला जातोय.

गणोजी शिर्के यांचे वंशज दीपक शिर्के यांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीची जे प्रकाशक आहेत त्यांना इतिहासातील संदर्भ दाखवा अशी नोटीस दिली आहे. चित्रपट दाखवायच्या आधी यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती की यावर तुमचं मत काय आहे ,आमचा सल्ला घेतला गेला नाही, असंही दीपक शिर्के यांनी म्हटलंय.दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावं अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही, त्यांनी चूक केली आहे, असं दीपक शिर्के यांनी म्हटलंय.या चित्रपटात इतिहासाची तोडमोड केली आहे. जाणीवपूर्वक इतिहास बदलला आहे .आमच्या घराण्याला बदनाम केलं जात आहे .

आमच्या घराण्याविरोधात हे षडयंत्र आहे, आमची करत बदनामी केली जात आहे.चुकीचा इतिहास दाखवला गेला असून आमच्या राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेल आहे .त्यांच्याकडं कुठलाही पुरावा नाही .छावा कादंबरी ज्यांनी लिहिली त्यांची देखील भेट आम्ही घेतली होती .राजे शिर्के घराण्याच खूप मोठ योगदान आहे .आम्ही गद्दारी केली असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत मग हे आरोप कसे केले जातात इतिहास गायब केला जात आहे .समजात तेढ निर्माण केली जात आहे , असंही त्यांनी म्हटलं.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button