पुणेआंतररष्ट्रीय

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक बातमी

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं, गारवा हॉटेलजवळ क्रॅश,चार जण जखमी

Spread the love

पुणे :पुणे जिल्ह्यातील पौड भागात हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पडल्याचा अंदाज आहे

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील पौड भागात घोटोडे भागाच्या हद्दीत एका डोंगराजवळ हेलिकॉप्टरचा सांगाडा सापडला आहे. मुंबईतून उड्डाण केलेले हेलिकॉप्टर आंध्र प्रदेशला जात असताना दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकू चार प्रवासी होते, त्यापैकी दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. स्थानिकांनी तातडीने अपघात स्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले

अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलेले नाही. हेलिकॉप्टरमधील चारही प्रवासी सुखरुप असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. मुंबईच्या ग्लोबल कंपनीचं हेलिकॅाप्टर असल्याची माहिती आहे. मुंबईहून हैदराबाद-विजयवाडाच्या दिशेने जात असताना हेलिकॅाप्टर कोसळलं. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये पायलटशिवाय तीन जण प्रवास करत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button