पिंपरी चिंचवडपुणेराजकीय
भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर


पिंपरी, पुणे (दि. ५ नोव्हेंबर २०२४) राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक ताळेबंद खाते विभागाकडून भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक निवडणूक निर्णय अधिकारी रेवननाथ लबडे यांनी जाहीर केले आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाप्रमाणे पहिली तपासणी १० नोव्हेंबर २०२४ रोजी होईल. १४ नोव्हेंबर रोजी दुसरी आणि तिसरी तपासणी १९ नोव्हेंबर २०२४ रोजी होईल. खर्च तपासणीची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता अशी आहे. भोसरी मतदारसंघातील पूर्णा नगर येथील बहुउद्देशीय सभागृह, सेक्टर नंबर १८, चिखली प्राधिकरण या निवडणूक कार्यालयात ताळेबंद खाते तपासणी खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांच्या निरीक्षणाखाली ही खर्च तपासणी करण्यात येणार आहे असे पत्रक निवडणूक निर्णय अधिकारी रेवननाथ लबडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
