पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीची दुसरी बैठक मोशीत साजरी झाली
दुसरी बैठक मोशी परिसरात यशस्वी झाली

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती 2024 यांच्या वतीने आयोजित परमपूज्य माता अहिल्यादेवी यांची 299 वी जयंती अत्यंत उत्साहाने साजरी करण्यासाठी शहरातील विविध भागात बैठका घेण्याचे सत्र सुरू आहे. यातील आजची दुसरी बैठक मोशी परिसरातील बाळूमामा मंदिरामध्ये शनिवार दिनांक 25 मे रोजी रात्री आठ वाजता संपन्न झाली. या बैठकीसाठी समिती अध्यक्ष धनंजय तानले, समिती सदस्य राजाभाऊ दुर्गे, गणेश खरात, बंडू मारकड, विठ्ठल देवकाते, सचिन जगदाळे, सतीश सुरवसे, आकाश खडके, रवींद्र नांदुरकर, गोविंद जोरी, कल्पना व्हनखंडे, बंडू लोखंडे, मारुती खडके, नवनाथ माने, अशोक शेंडगे, परमेश्वर उगारे, संजय कवितके, संतोष पांढरे, संजय नाईकवडे, अशोक खर्चे, सौ वर्षा खर्चे, राम मिजगर, हिरामण इंगळे, रामचंद्र थोरात आदी सर्वजण उपस्थित होते मोशी परिसरातून प्रचंड संख्येने वाजत गाजत अहिल्यादेवी होळकर स्मारक पिंपरी या ठिकाणी पोहोचण्याचा शब्द सर्व समाज बांधवांनी आम्हाला दिला. त्याबद्दल सर्व मोशीकरांचे खूप खूप आभारी आहोत.
