शहरातील खेळाडूंना आमदार अण्णा बनसोडे यांचे प्रोत्साहन
पिंपरी मतदारसंघातील खेळाडूंनी घेतली आमदार अण्णा बनसोडे यांची भेट


पिंपरी :पिंपरी शहर परिसरातील खेळाडूंना आमदार अण्णा बनसोडे यांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. कुस्ती, क्रिकेट अशा विविध खेळांच्या माध्यमातून उत्तम खेळाडू घडविण्याचे काम अण्णा बनसोडे यांच्याकडून होत आहे. त्यामुळे शहर परिसरातील खेळाडू अण्णा बनसोडे यांच्या मागे उभे असल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे यांची शहरातील खेळाडूंनी भेट घेतली. यावेळी दीपक धोत्रे, संतोष भोसले, प्रकाश मोरे, आकाश वाकोडे, शशिकांत कदम, रोहित वाघमारे, सागर पाचपिंडे, दत्ता चव्हाण, खंडू डोंगरे, माऊली भोसले, सागर जाधव, रवी मोरे, तेजस पवार, भीमा राठोड, वाल्मीक पाटोळे, राहुल गुरखा, रोहित मनवर, रोहित राठोड, स्वप्निल खुळे, विनय चव्हाण, विनय पवार, योगेश मल्लिकर, कृष्णा शेट्टी, अजय आवळे, आकाश कसबे, मुकेश बजलोरे, अवी आयगोळे, मोहित भोसले, ऋषी सरोटे आदी खेळाडू उपस्थित होते.
आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून पैलवान दत्तक योजनेअंतर्गत होतकरू पैलवानांना वैयक्तिक मदत केली जात आहे. दरवर्षी मतदार संघात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमधून चांगल्या खेळाडूंची पुढील स्पर्धांसाठी निवड केली जाते. यातून अनेक चांगले खेळाडू तयार झाले आहेत.
आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेतल्यानंतर खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्थानिक पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना चांगले व्यासपीठ अण्णा बनसोडे यांनी उपलब्ध करून दिले. त्यातून अनेक खेळाडूंना चांगली चालना मिळाली. मिळालेल्या संधीचे खेळाडूंनी सोने केले असून अनेक खेळाडू राज्य पातळीवर खेळत आहेत. तसेच क्रीडा क्षेत्रात विविध पदांवर काही काही खेळाडू कार्यरत झाले आहेत. त्यामुळे शहरातील सर्व खेळाडू अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी असल्याचे उपस्थित खेळाडूंनी मत व्यक्त केले.
आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, शहरातून चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत. विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या शहरातील खेळाडूंनी चांगले यश संपादन करावे. यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. होतकरू खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांना चांगली संधी निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.