समाजकार्याचे घेतलेले व्रत सेवानिवृत्तीनंतर देखील अविरतपणे सुरू
२०२४ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्यासह एकुण ५० अधिकारी आणि कर्मचा-यांचा सत्कार

पिंपरी, दिनांक २८ जून २०२४ – महापालिका प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून सामाजिक सेवा करण्याची मला महत्वपुर्ण सुवर्णसंधी लाभली, अग्निशमन विभागात फायरमन म्हणून सुरु केलेला प्रवास अतिरिक्त आयुक्त पदापर्यंत येऊन पोहोचला. या प्रवासात शहरातील लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच या प्रवासात कुटुंबियांनी देखील मोलाची साथ लाभली. समाजकार्याचे घेतलेले व्रत सेवानिवृत्तीनंतर देखील अविरतपणे सुरू ठेवून लोककल्याणासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे जून २०२४ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्यासह एकुण ५० अधिकारी आणि कर्मचा-यांचा सत्कार सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
या सत्कार समारंभास उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता किशोर निंबाळकर, कर्मचारी महासंघाचे अभिमान भोसले, उमेश बांदल, नथा मातेरे आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, अकबर शेख, कार्यालय अधिक्षक रमेश चोरघे, लेखापाल पुनमचंद बलदोटा, मुख्याध्यापक शशिकांत गायकवाड, मुख्याध्यापिका माधुरी लवटे, शितल काकडे, सविता केसकर, सफिया शेख, मुख्य लिपीक रमेश लांडगे, सुनिल काळदंते, विकास शिंदे, उषा माने, उप लेखापाल संजय काळभोर, सिस्टर इन्चार्ज शोभा भारती, सीमा मोरे, स्टाफ नर्स, प्रतिभा गोडसे, सुरेखा समुद्रे, कनिष्ट अभियंता सुभाष राठोड, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शिवकुमार ग्वालवंशी, वीज पर्यवेक्षक दिलीप गुंजाळ, सहाय्यक उद्यान निरीक्षक गोपाळ खैरे, लिपीक गणेश पौनिकर, सहाय्यक शिक्षक मधुकर भिसे, विशेष शिक्षक राजू भगत, उपशिक्षक सीमा पंडित, बाबूराव लांघी, वसुंधरा कुलकर्णी, सुतार राजेंद्र हात्ते, प्लंबर बाळू चिव्हे, वाहनचालक किशोरकुमार शितोळे, मुकादम लहू पंचरास, शिपाई भीम निकाळजे, बिभीषण सपकाळ, शिवाजी गव्हाणे, राजकुमान साबळे, वॉर्डबॉय ज्ञानेश्वर काटे, मजूर सुरेश जगताप, रमेश पवार, नंदू कंपिले, किसन वाघेरे, बाबू फुगे, यशवंत मोहिते, रखवालदार साहेबराव जाधव, रामचंद्र भागीत, सफाई कामगार भानुदास बनकर, बेबी लोखंडे, नंदा ओव्हाळ यांचा समावेश आहे.
सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर म्हणाले, आज सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उणीव महापालिकेस नेहणी जाणवत राहील, गेली अनेक वर्षे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली आता यापुढील आयुष्य आपले आरोग्य सांभाळून आपल्या कुटुंबियांसमवेत आनंदाने जगावे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, उपस्थितांचे आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.