पिंपरी चिंचवड

 सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठात श्रम संस्कार शिबीराचे आयोजन

Spread the love

एन. एस. एस. कॅम्प श्रीक्षेत्र येलवाडी येथे संपन्न

 

पिंपरी :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सुभद्राज एज्युकेशन सोसायटीचे SNBP विधी महाविद्यालय, मोरवाडी, पिंपरी,पुणे यांचे वतीने जि.प.शाळा श्रीक्षेत्र येलवाडी ,पुणे येथे दि.१६/०१/२५ते २२/०१/२५रोजी पार पडला.

शिबिराच्या उटघाटनप्रसंगी प्रा. रोहिणी जगताप, उप. प्रा.कैलास पोळ, सरपंच रणजित गाडे, ग्रामसेविका सौ. पूनम सेवाळे, पोलीस पाटील. प्रदीप गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

*श्रम संस्कार शिबीर*

  या ७दिवशीय शिबीर दरम्यान विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, श्रमदान ,व्याख्यान ,शासकीय सेवांची माहिती, नदी स्वछता श्री क्षेत्र देहू,भंडारा डोंगर व श्रीक्षेत्र येलवाडी विविध कार्यक्रम आयोजित कारण्यात आले होते.

व्याख्यानमालेच्या कार्यक्रमामध्ये सौ. प्रिया तोतले यांनी वकिली कौशल्य, ॲड मंगेश खराबे यांनी जमीन हक्क कायदा व भारतीय न्याय संहिता, प्रा. श्री. विकास कंद यांनी महापुरुषांचे जीवन, आणि सौ. वैष्णवीताई पोटे यांनी राष्ट्रसंतांच्या ग्रामगितेवर व्याख्यान केले.

शिबिराला सदिच्छा भेट देण्यासाठी सुभद्रा एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक. मा. डॉ. डी. के. भोसले, अध्यक्ष.डॉ.वृषाली भोसले, संचालक. मा. देवयानी भोसले, संचालक. डॉ. ऋतुजा भोसले यांनी भेट दिली.

रा.स्व.से.कार्यक्रमधिकारी. गजानन वडूरकर, विद्यार्थी समन्वयक. प्रताप मोहोड, मिलिंदराजे भोसले.

राष्ट्रीय स्वयंसेवक. प्रज्ञा पाटील, प्राजक्ता गायकवाड,तुषार मानकर,चंद्रकांत जगदाळे, प्रशांत मोरे, वैभव सलार यांनी शिबिराच्या शेवट मनोगत व्यक्त करत शिबिरात येण्याची संधी मिळाली त्याबद्दल आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button