आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित भाऊ गव्हाने यांना जाहीर पाठिंबा
महाराष्ट्रातले बदलायची वेळ आली आहे


भोसरी :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अधिकृत उमेदवार अजित दामोदर गव्हाने यांना जाहीर पाठिंबा दिला व आमदार म्हणुन विधानभवनात पाठवु आसा विश्वास छावा संघटनेच्या पदाधिकारी यांनी दिला,,, सरकारने मराठा आरक्षण,धणगर आरक्षण व शेतकरी यांची कर्ज माफी केली नाही व तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले ते हे महायुतीचे सरकार रोखवु शकले नाहीत.

छावा संघटनेचे विध्यार्थी आघाडी चे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी नेते विजय कुमार घाडगे पाटील हे तब्बल पंधरा दिवस सोयाबीनला 8000 भाव मिळावा यासाठी उपोषणाला बसले होते,याची दखल सरकारने घेतली नाही हे सरकार शेतकरी, कामगार, मराठा व धनगर समाजाला न्याय देऊ शकला नाही म्हणून महाराष्ट्रातले बदलायची वेळ आली आहे,,, यासाठी आखिल भारतीय छावा संघटनेने एक संस्कृत व सुशिक्षित उमेदवार अजित गव्हाणे यांना पाठिंबा दिला.
यावेळी आखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ चिंचोळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन आण्णा लिमकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राम भाऊ सुर्यवंशी पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय भाऊ बोडके, पुणे जिल्हा अध्यक्ष शिक्षक आघाडी प्रशांत फड सर,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश जाधव,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजय भाऊ कांबळे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शोसल मिडिया शुभम बिरादार, कुणाल शिंदे,व आदि कार्येकर्ते उपस्थित होते