शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहतील
तिन्ही मतदारसंघात आमदार निवडून येणार आसा विश्वास दाखवला


पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून येतील असा विश्वास पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यापूर्वीही त्यांनी सभागृह नेता, महापौर आणि विरोधी पक्षनेता म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

यावेळी महिला अध्यक्ष कविता आल्हाट,युवक अध्यक्ष शेखर काटे,युवती अध्यक्ष वर्षा जगताप, माजी नगरसेवक श्याम लांडे, माया बारणे, माई ढोरे, फजल शेख, गोरक्ष लोखंडे, विजय लोखंडे, मायला खत्री, ज्ञानेश्वर कांबळे, ज्योती गोफने, कविता खराडे, वर्षा जगताप, संगीता कोकणे, मनीषा गटकळ यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
बहल पुढे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या चिंचवडमधून शंकर जगताप आणि भोसरीतून महेश लांडगे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार अण्णा बनसोडे, काळुराम पवार, सीमा सावळे, जितेंद्र ननावरे, माजी आमदार गौतम चाबुस्कवार, चंद्रकांता सोनकांबळे, राजेश पिल्ले आणि तेजस्विनी कदम यांनी अजित पवार यांच्याशी भेट घेऊन उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखे आणि उमा खापरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे. उमेदवारांची निवड सर्वेक्षण आणि जनतेच्या मते विचारात घेऊन पिंपरी विधानसभेत उमेदवार दिला जाईल.
योगेश बहल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, विधानसभा निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. हे लक्षात घेता, काही पदाधिकारी पक्ष सोडण्याची शक्यता आहे, परंतु नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात येईल. महायुतीच्या धर्माचे पालन करून, पक्षाचे निष्ठा ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहतील, तसेच पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून येईल असा विश्वास योगेश बहल यांनी व्यक्त केला.