पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

3 डिसेंबर रोजी “पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे” आयोजन

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे आवाहन

Spread the love

 

स्थानिक पत्रकारांनी पुढाकार घेऊन ही शिबिरं यशस्वी करावीत

 

 

 

 

मुंबई : 3 डिसेंबर 1939 रोजी मराठी पत्रकार परिषदेची मुंबईत स्थापना झाली. मराठी पत्रकार परिषदेचा हा स्थापना दिवस राज्यात गेली दहा वर्षे “पत्रकार आरोग्य दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्थानिक डॉक्टर्सच्या मदतीने पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. गंभीर आजाराचा रूग्ण सापडल्यास त्यास मुंबईस पाठवून त्याच्यावर उपचार केले जातात. गेल्या वर्षी पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांना राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील 265 तालुक्यात ही शिबिरं झाली. त्यात 10,000 पेक्षा जास्त पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हा जागतिक विक्रम होता.. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजे 3 डिसेंबर 2024 रोजी राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेण्यात येणार आहेत. राज्यात 354 तालुके आहेत या सर्व तालुक्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्थानिक पत्रकारांनी पुढाकार घेऊन ही शिबिरं यशस्वी करावीत असं आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी केलं आहे.

 

पत्रकारांचं आयुष्य दगदगीचं असतं.. जागरण, अवेळी जेवण, तणाव या सर्वांचा पत्रकारांच्या प्रकृतीवर परिणाम होत असतो. मात्र हे दुखणे अनेकदा अंगावर काढले जाते.. विषय हाताबाहेर जातो तेव्हा वेळ निघून गेलेली असते.अशी वेळ कोणत्याच पत्रकारावर येऊ नये यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठीच ही शिबिरं होत आहेत. स्थानिक पातळीवर सर्व पत्रकारांनी एकत्र येत शिबिरं यशस्वी करावीत असं आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष हाजी मन्सूरभाई शेख, राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button