पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रराजकीय

बफर झोन कमी झाल्यामुळे पायाभूत सोयी-सुविधा मिळाल्या 

मोशी कचरा डेपोवरील प्रकल्पांमुळे नागरी आरोग्य संवर्धन

Spread the love

कृपया प्रसिद्ध

 

पिंपरी- चिंचवड:अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि तत्कालीन आमदारांनी दुर्लक्ष केलेला मोशी येथील ‘बफर झोन’चा प्रश्न आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच सुटला आहे. लांडगे यांच्या पाठपुराव्याने ‘बफर झोन’ची हद्द ५०० मीटरवरून १०० मीटर इतकी कमी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आम्ही महेश लांडगे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मोशीकरांनी दिली. या भागातून विजयी मताधिक्य देण्याचा निर्धार केला.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी मोशीतील आदर्शनगर, खान्देशनगर, गंधर्वनगरी, तापकीरनगर, फातिमानगर, संत ज्ञानेश्वरनगर परिसरातील सर्व कॉलनीतील नागरिकांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. चंद्रकांत नखाते, वंदना आल्हाट, निखिल बो-हाडे, राजश्री सस्ते, गणेश सस्ते यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार लांडगे यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आणि विजयी मताधिक्य देण्याचा निर्धार मोशीकरांनी केला.

मोशी येथील कचरा डेपोसाठी ‘बफर झोन’ची हद्द ५०० मीटर करण्यात आली होती. त्यामुळे येथील काही नागरिकांनी ही हद्द होण्याआधीपासूनच अर्धा-एक गुंठा जमीन घेऊन तेथे बांधलेली घरे बाधित होत होती. त्यामुळे रस्ता-पाणी-वीज या सारख्या पायाभूत सुविधा मिळविण्यात अडचण निर्माण निर्माण झाल्या होत्या. या घरांवर कारवाईची टांगती तलवार होती. आमदार महेश लांडगे यांनी ‘बफर झोन’ची हद्द कमी करण्याबाबत सातत्याने अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली होती. त्यांच्या पाठपुराव्याने ‘बफर झोन’ची हद्द ५०० मीटरवरून १०० मीटर इतकी कमी करण्यात आली. त्यामुळे आमच्या घरांवरील कारवाईची टांगती तलवार दूर झाली. या भागात रस्ता, पाणी, वीज या सुविधा मिळू लागल्या आहेत. हा प्रश्न केवळ आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच सुटला आहे. त्यामुळे आम्ही लांडगे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. या भागातून विजयी मताधिक्य आमदार लांडगे यांना दिले जाईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया :

मोशीतील कचरा डेपोसाठी ‘बफर झोन’ची हद्द ५०० मीटर असल्यामुळे परिसरातील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळविण्यात अडसर येत होता. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘बफर झोन’ची हद्द कमी होणे अनिवार्य होते. त्यासाठी स्थानिकांच्या मदतीने पाठपुरावा करून हद्द कमी केली. त्यामुळे या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देता आल्या आहेत. आता मोशी कचरा डेपोवर वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि बायोमायनिंगचा दुसरा टप्पाही कार्यान्वयीत करण्यात येणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button