पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रराजकीय

विजयाच्या हॅट्रिकसाठी दहा हत्तींचे बळ तुमच्या पाठीशी उभे करू ! 

सुसंस्कृत' नेत्यांना दादांनी आरसा दाखवला : माजी नगरसेवक विकास डोळस

Spread the love

 

 

कार्यकर्ते झाले भावूक : आमदार महेश लांडगे तुम्ही मन जिंकलं!

 

 

पिंपरी :कसरतीने कमावलेली शरीरयष्टी, धिप्पाड देहबोली, रुबाब असा की नुसत्या नजरेने समोरचा गारद होईल. पण आज पुन्हा एकदा या भोसरीच्या पैलवान आमदार महेश लांडगे यांच्या हृदयातला हळवा कोपरा कार्यकर्त्यांनी अनुभवला. “माझ्या कार्यकर्त्याला, जपलेल्या माणसांना, धक्का जरी लागला तर माझ्यातला महेश लांडगे जागा होईल”असे दादा तुम्ही जेव्हा भरगच्च व्यासपीठावरून, हजारो नागरिकांच्या समोर निक्षून सांगितलं. तेव्हा कार्यकर्ते म्हणून आमचा उर भरुन आला. कार्यकर्त्यांची डोकी फुटली तरी राजकारणच करू पाहणाऱ्या ”सुसंस्कृत” लोकांना दादा तुम्ही आरसाच दाखवला, अशा भावना माजी नगरसेवक विकास डोळस यांनी व्यक्त केल्या आहेत.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांच्या सभेचे दिघी येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांचा मुद्दा निघाला तेव्हा महेश लांडगे यांनी रौद्ररूप धारण केले.

 

आमदार महेश लांडगे म्हणाले की, माझ्यावर आरोप करा, फेक निरेटिव्ह चालवा पण माझ्या माणसांना बोल लावू नका. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय चऱ्होली, चिखली मध्ये हा प्रकार समोर आला. माझ्या कार्यकर्त्याला कोणी त्रास दिल्यास मी सहन करणार नाही. विरोधकांनी हे न थांबवल्यास २० नोव्हेंबर नंतरचा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा. माझ्या शांततेचा अंत पाहू नका. गेली दहा वर्ष मी शांत आहे. माझ्या माणसांसाठी, कार्यकर्त्यांसाठी मी बदललो. माझ्या विरोधात सगळे एकवटले, हरकत नाही. तुमच्या महत्वाकांक्षा मोठ्या आहेत. मी माझी महत्त्वकांक्षा पुढे ठेवून काम केले नाही आणि करणार ही नाही. समाजासाठी मी काम केले. माझ्या कार्यकर्त्यांसाठी झटलो. माझ्या कार्यकर्त्यांना धक्का जरी लागला तर तुम्हाला माझ्यातला महेश लांडगे २० नोव्हेंबर नंतर दिसेलच, असा इशाराही आमदार लांडगे यांनी दिला आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांबद्दल भावना जाणून घेतल्यानंतर प्रत्येकालाच १० हत्तीचे बळ आले आहे. आता निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतले आहे. दादा तुम्ही निश्चिंत रहा. कार्यकर्ते तुमच्यासाठी जिवाचे रान करतील. आमचा थोरला भाऊ म्हणून तुमच्यासाठी विजय खेचून आणू ही आमची ग्वाही आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button