205 चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल दादा कलाटे यांना डांगळे गटाचा जाहीर पाठिंबा
रिपब्लिकन जनशक्ती च्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे.


पिंपरी :चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांना रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अर्जुनराव डांगळे, प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष माऊली उर्फ किसन भोसले यांनी या पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिला असून रिपब्लिकन जनशक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर गेले बारा वर्षे युतीत असून महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे.राहुल कलाटे हे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व असून त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना जनहिताचे अनेक विकासाची काम केले असून सामान्य माणसांच्या प्रश्नांना त्यांनी योग्य न्याय दिलेला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निश्चितपणे विजय होणार असून या विजया मागे रिपब्लिकन शक्ती आपला महत्त्वाचा खारीचा वाटा विजयचा उचलणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांना नागरिक निवडून देतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राहुल कलाटे विजयी झाल्यास ते सामान्य माणसाच्या प्रश्नाला निश्चितपणे न्याय देतील.तसेच विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती-धर्माच्या घटकांना बरोबर घेऊन विकास करतील याचा विश्वास असल्यामुळे त्यांना या पत्राद्वारे रिपब्लिकन जनशक्ती च्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे. यावेळी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष संग्राम रोहोम, महिला संघटिका गायत्री भोसले, महादेव सरवदे किरण काळे, अनिल पवार, अल्पसंख्याक आघाडीचे शेख मामू, श्रीमंत भोसले उपस्थित होते
