सोलापूर जिल्ह्यात केळी उत्पादनाची मोठ्या प्रमाणात निर्यात
एका वर्षात साडेपाच लाख टण निर्यात


सोलापूर :सर्वाधिक केळी उत्पादनाव्या जळगावठा मागे टाकून सोलापूर जिल्हा केळी निर्मातीत अव्वल बनता आहे. या पार्श्वभूमीवर आता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी याठिकाणी केळी संशोधन केंद्र मुरू करण्याच्या हाठवातींना वेग आला आहे. राज्याच्या कृषी विभागाने त्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राहुरी कृषी विद्यापीठाचे फलोत्पादन विभागप्रमुख, शेलगाव वांगीचे प्रक्षेत्र प्रमुख व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकान्यांचा समावेश असलेली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवणार आहे. सोलापूर जिल्ह्यात लागवडीयोग्य क्षेत्र १९ लाख७३ हमार हेक्टर असून त्यात फळपिकांखालील क्षेत्र आता दीड लाख हेक्टरवर पाँचले आहे. नित्यात आठ लाख शेतकरी असून उजनी धरणाच्या पाण्यामुळे रब्बीच्या जिल्ह्यात आता बरिपाखालीत क्षेत्रात लक्षणीय वाढ झाठी आहे. सोलपूर जिल्ह्यात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र जाहे. पण केली निर्यातीत अन्वत बनलेल्या मोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र नाही जिल्ह्यातील देवती, खंडाळी, आही, शेटफळ (ता मोहोळ). टेंभुर्णी (ता. माढा), कंदर, जेकर, वाशिंबे बरकटणे (वा. करमाळा), करकंब (ता. पंढरपूर), अकलूज (ता. माळशिरस) या भागात मोठ्या प्रमाणावर केळीचे क्षेत्र आहे. त्याठिकाणचे शेतकरी दरवर्षी केळीची निर्मात करतात, परदेशातून सोलापूर जिल्ह्याच्या केळीला मोठी मागणी देखील आहे. तब्बल साडेपाच लाख मे. टन केळीची निर्यात केली असून त्यातून शेतकऱ्यांना कोटयाधवची रुपयांचा फायदा झाला आहे. जी-९ यासाह अन्य वाणाची जिल्ह्यात लागवड केली जाते. राहुरी विद्यापीठाचों शेलगाव बांगो (ता. करमाळा) येथे १०० एकर जमीन आहे. त्याठिकाणी केळी संशोधन केंद्र प्रस्तावित आहे

येथे डाळिंब संशोधन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने स्वतंत्र समिती नेमली असून समितीचा अहवाल लवकरच शासनाला सादर होईल. सोलापूर जिल्ह्यात केळीचे क्षेत्र व निर्यात वाढत असून केळी , जर्मनी, चीन अशा देशांमध्ये निर्यात होते. केळीचे क्षेत्र वाढावे, ते टिकावे आणि शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी जिल्ह्यात संशोधन केंद्राची गरज असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे.