अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ जनजागरण मोहिमेचा चित्ररथ तसेच सेल्फी बूथ सर्वाचे आकर्षण
विविध उपाययोजना, उपक्रम, प्रकल्प यामध्ये नागरिकांचा सहभाग असणे


पिंपरी, दि. १५ ऑगस्ट २०२४ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या शुभहस्ते आज १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पिंपरी येथील महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात पार पडला. ध्वजारोहण सोहळ्यापाठोपाठ झालेल्या या कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेला ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ जनजागरण मोहिमेचा चित्ररथ तसेच सेल्फी बूथ सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपआयुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, संदीप खोत, रविकिरण घोडके, अण्णा बोदडे, निलेश भदाणे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, पंकज पाटील, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, ज्येष्ठ वैदयकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, ऋतुजा लोखंडे, शैलजा भावसार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, कर्मचारी महासंघाच्या चारूशीला जोशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, महापालिका कर्मचारी आदी उपस्थित होते.
- पिंपरी-चिंचवड शहरातील विविध उपाययोजना, उपक्रम, प्रकल्प यामध्ये नागरिकांचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिकेस रस्ते, सांडपाणी, आरोग्य, उद्याने, क्रीडांगणे आणि सार्वजनिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा नव्याने मागणी करण्यासाठी मदत होणार आहे. यापूर्वी अर्ज जमा करण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या संबंधित विभागीय कार्यालयांना भेट द्यावी लागत असे. त्याऐवजी २०२४ या आर्थिक वर्षापासून “पीसीएमसी स्मार्ट सारथी” या मोबाईल ॲपवर आता नागरिकांना त्यांच्या अपेक्षा, सूचना, कल्पना ऑनलाईन घर बसल्या नोंदवता येणार आहेत.
या जनजागरण मोहिमेमध्ये वृत्तपत्रे, रेडिओ, व्हीएमडी बोर्डस याखेरीज सोशल मीडियाचा देखील वापर प्रभावीपणे केला जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.