पार्थ पवार पिंपरी चिंचवड आमदार खासदार पक्ष वाढवण्या साठी जोरदार तयारीत
पिंपरी सह चिंचवडच्या जागेसाठी आग्रही


पिंपरी :लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मदत केली म्हणून श्रीरंग बारणे निवडून आले. त्यांचे पुत्र विश्वजित बारणे यांना यासंदर्भात माहिती आहे. ते माध्यमांसमोर काहीही बोलू देत, मावळमधून संजोग वाघेरे पुढे होते, बारणे निवडून येतील अशी परिस्थिती नव्हती. राष्ट्रवादीने मदत केली नसती तर बारणे निवडून आले नसते, असे स्पष्टीकरण पार्थ पवार यांनी मंगळवारी येथे दिले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे मागील काहीन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात दौरे वाढले आहे. राष्ट्रवादीला लागलेली गळतीथांबविण्यासाठी ते प्रयत्नशील दिसत आहेत. मंगळवारी ते ओसरी आणि पिंपरी विधानसभामतदारसंघातील आढावा घेण्यासाठी आले होत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले की, विधानसभेला बारामतीच्या जागेसाठी युगेंद्र पवार इच्छुक आहेत. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा आहे. शेवटी शरद पवार निर्णय घेतील. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्याविषयी जास्त बोलणार नाही. आमच्या पक्षाच्या पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्ष पदाबाबत अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अंतिम निर्णय घेतील. पण आमच्यासाठी पक्षातील सर्व वरिष्ठ नेते शहराध्यक्षच आहेत. हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मला आमदार किंवा खासदार व्हायचे नाही. पक्षवाढीसाठी प्रयत्न करायचे आहेत.