मराठा सेवा संघाच्याशहराध्यक्षपदी कार्यकारी अभियंते आबासाहेब ढवळे यांची निवड झाली.


पिंपरी : मराठा सेवा संघाच्याशहराध्यक्षपदी महापालिकेतील कार्यकारी अभियंते आबासाहेब ढवळे यांची निवड झाली. निवडीबद्दल त्यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष प्रवीण कदम यांनी सत्कार केला.

यावेळी कदम म्हणाले की, मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून ढवळे संघटनेत कार्यरत आहेत. महापालिकेतील निवृत्त अधिकारी अमृत सावंत यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे. मराठा सेवा संघाच्या विविध कक्षांची बांधणी ते करतील,
असा विश्वास वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले- आंबेडकर आणि पुरुषोत्तम खेडेकर यांना अभिप्रेत असलेली समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ढवळे यांनी प्रयत्न करावेत.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहर कार्याध्यक्ष आप्पासाहेब चांदवडे, उपाध्यक्ष तेजस गवई, कोषाध्यक्ष राजेश सातपुते, मुख्य संघटक परशुराम रोडे, माजी सैनिक मधुकरराव माने, रिक्षा संघटना शहराध्यक्ष नारायण बिरादार आणि पदाधिकारी उपस्थित होते.