रमेश साठे यांनी सनय छत्रपती शासन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी निवड


पिंपरी :विविध दैनिक, डिजिटल मीडिया ,वर्तमानपत्रे, साप्ताहिक, पोर्टल त्याचप्रमाणे मुक्त पत्रकार बंधू आणि भगिनी सप्रेम नमस्कार…

“रमेश युवराज साठे” रा- माण ता- मुळशी जिल्हा- पुणे माझी सनय छत्रपती शासन या पक्षाच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी *सनय छत्रपती शासन पक्ष* महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय संस्थापक मा. प्रा. नामदेवराव जाधव साहेब यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आलेली आहे.पक्षाध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून पुढील काळात सनय छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगार निर्मिती,गडसंवर्धन, शिव संस्कार, उद्योजकता, रोजगार ,आरोग्य तसेच बेकारीमुक्त ,कर्जमुक्त, घराणेशाही मुक्त महाराष्ट्र उभा करण्यासाठी भरिव कामगिरी करण्याची व सनय छत्रपती शासन पक्षाचे महाराष्ट्रभर संघटन मजबूत करण्याचे वचन देतो. अशाप्रकारे सनय छत्रपती शासन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव साहेब यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरविण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेऊन अखंडपणे पक्ष मजबुतीसाठी कार्यरत राहणार त्याचप्रमाणे माझ्याकडून कोणत्याही प्रकारचे पक्षाविरोधी कृत्य अथवा असंविधानिक काम होणार नाही तर पक्षाचे ध्येय व धोरणाना अनुसरून प्रत्येक कृती असेल.