जिल्ह्यात १५ ऑगस्टपर्यंत महसूल पंधरवड्याचे आयोजन*
नागरिकांनी या पंधरवड्यात उत्सर्फूतपणे सहभागी होऊन योजना व सेवांचा लाभ घ्यावा,नागरिकांनी या पंधरवड्यात उत्सर्फूतपणे सहभागी होऊन योजना व सेवांचा लाभ घ्यावा,

पुणे, दि. ३१: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार यावर्षी राज्यात महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा शुभारंभ भेगडे लॉन्स वडगाव ता. मावळ येथे सकाळी ११ वा. होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित राहणार आहेत
जिल्ह्यात १ ते १५ ऑगस्टपर्यंत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार असून या कालावधीत महसूल विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच विभागाच्या विविध योजनांचा लाभ, दाखल्यांचे वितरण आणि सेवा सुविधांची माहितीही देण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी या पंधरवड्यात उत्सर्फूतपणे सहभागी होऊन योजना व सेवांचा लाभ घ्यावा,
असे आवाहन श्रीमती कदम यांनी केले आहे.