समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न


*स्वच्छता अभियान-2024*
हे समीर लॉन्स (सर्व्हिस रोड)रावेत
येथे सुनियोजित वेळेत यशस्वी पुर्ण झाले.
*या अभियानात समविचारी समाजाप्रती, पर्यावरणाप्रती असलेली तळमळ असणाऱ्यां संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.300 पेक्षा अधिक सदस्यांनी सकाळी 6.32 वाजता सुनियोजित वेळेत स्वच्छता अभियानात सक्रीय सहभाग घेऊन दोन कि.मी.परिसर कचरा, प्लास्टिक उचलून साफ सफाई करत स्वच्छ केला.*
*अखेर….*
*आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारत स्वच्छता अभियानामध्ये आपल्या परिवाराच्या वतीने मा.क्षेत्रीय आरोग्य निरीक्षक श्री शंकर घाटे, आरोग्य सह्यक विकास शिरवाळे,आत्माराम जमादार, हनुमंत जाधव, प्रमिला शिंदे,अनिल तुपे,सुरज कल्याणी, दिपक रिटे आणि सर्व स्वच्छता सहभागी कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देवून सत्कार वजा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.*
*सर्व उपस्थिती सदस्यांनी दरम्यानच्या काळात स्वच्छता व पर्यावरणाची शपथ घेतली.*
महानगर पालिकेचे सर्व अधिकार व कर्मचारी अगदी वेळेत हजर असल्याने सर्व संस्थांच्या वतीने त्यांचे कैतूक करण्यात आले.
*आपल्या शहरासाठी,राज्यासाठी,
देशासाठी एकत्र येऊन पर्यावरण, वसुंधरेसाठी काम करण्याचा विचार सर्व संस्थांच्या सदस्य, अध्यक्षांनी मांडला .
*आज स्वच्छता करता करता खालील घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून गेला.स्वच्छता विषयी घोषणा देत समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न स्वयंसेवकांनी मनापासून केला.*…
*घर घर नारा,*
*स्वच्छ देश हमारा…*
*आमचे शहर,*
*स्वच्छ शहर,*
*हरित शहर,*
*आपली जबाबदारी…*
*प्लास्टिक मुक्त भारत देश हमारा….*
*आपला परिवार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.एस.आर.शिंदे सर यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.*
*स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मकरसंक्रांत आणि एक हात मदतीचा हे चार उपक्रम राबवले जातात.*
आजच्या अभियान मध्ये
मैत्री भुषण सोसायटी, गावीत मित्र मंडळ,जुन्नर तालुका मित्र मंडळ, रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी,
अलायन्स कल्ब ऑफ पिंपरी चिंचवड, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड, हिंदू खाटीक संघटना आणि नवचैतन्य हास्य क्लब, दापोडी या संस्थेनी सहभाग घेतला.
संस्थेच्या वतीने महानगर पालिका कर्मचारी व अधिकारी यांना विशेष सलामी देण्यात आली.
वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला परिवाच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.उपस्थिताचे आभार
नवनाथ नलावडे यांनी मानून सामुदायिक पसायदान घेऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.
