पिंपरी चिंचवड

भोसरीतील नाना नानी पार्क मित्र मंडळाचा पर्यावरण पूरक उपक्रम

Spread the love

 

 

पिंपरी, पुणे (दि. ६ मार्च २०२५) भोसरी इंद्रायणी नगर येथील नाना नानी पार्क मित्र

मंडळाच्या १२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळातर्फे वृक्ष संवर्धनाचा झाडे लावा, झाडे जगवा हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या सर्व सभासदांनी भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशन जवळील सर्कल ग्राउंड लगत असणाऱ्या झाडांची व परिसराची साफसफाई करण्यात आली व त्यांना टँकर द्वारे पाणी देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रासकर, वरिष्ठ सल्लागार दत्तात्रय दिवटे, खजिनदार अशोक तनपुरे, सचिव मधुकर गुंजकर, सहसचिव बशीर भाई, कार्याध्यक्ष माणिक पडवळ, उपाध्यक्ष रमेश साळुंखे, आबासाहेब रुपनवर, प्रकाश सोमवंशी, विनोद झांबरे पाटील व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी उपक्रम आयोजना सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button