पुण्यश्लोक अहिल्यादेवी गौरव पुरस्कार
अहिल्यादेवींच्या नावे इंग्रजी पुस्तक प्रकाशन !!!* *!!! 5 वी ते 10 वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

चित्रकला स्पर्धा बक्षीस समारंभ !!!*

*!!! अहिल्यादेवी यांच्या गितांचा कार्यक्रम !!!*
*!!! सांगली येथील उत्कृष्ठ गजनृत्य कार्यक्रम !!!*
*!!! आणि सर्वात शेवटी अत्यंत चवीष्ट भोजन व्यवस्था !!!*
*अशा थाटात साजरी झाली पिंपरी चिंचवड शहरात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती.*
*व्यासपीठावर उपस्थित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार ज्यांच्या शुभहस्ते दिला जाणार होता ते पद्मश्री गिरीशजी प्रभुणे साहेब, हा पुरस्कार ज्यांना दिला जाणार होता ते सामाजिक कार्यकर्ते बाबा कांबळे, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार दिला जाणार होता ते भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ जगताप आमदार अश्विनीताई जगताप, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, हेमंत हरहरे साहेब, विलास लांडगे साहेब, माहेश्वर मराठे साहेब, संदीप जाधव साहेब, नगरसेविका सुलक्षणा शीलवंत धर, श्रीयुत नाना काटे, श्रीयुत सदाशिव खाडे, श्रीयुत बाळासाहेब वाल्हेकर, सौ शैला पाचपुते, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, प्रीती कामतीकर आदी सर्वजण उपस्थित होते. आमदार महेश दादा लांडगे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी येऊन आम्हा सगळ्यांना भेट दिली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.*
*जयंती महोत्सवाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाने झाली रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याने आणि समाज जीवनात रक्ताची गरज अत्यंत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आलेल्या नागरिकांना, भक्तांना स्वइच्छेने रक्तदान करण्याची संधी या कार्यक्रमामुळे मिळाली.*
*परम पूज्य माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पद्मश्री गिरीशजी प्रभुणे साहेब, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ जगताप आणि इतर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून व्यासपीठावरील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.*
*आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे धनंजय तांडले यांनी स्वागत कर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर समिती सदस्य माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांनी प्रास्ताविक केले.*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चिन्मय मुळे या लेखकांनी लिहिलेले ” क्वीन ऑफ इंडोमीटेबल स्पिरिट ” नावाच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री गिरीजी प्रभुणे साहेब यांच्या शुभहस्ते आणि सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार हा दुसरा पुरस्कार पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते बाबा कांबळे यांना सन्माननीय पद्मश्री गिरीशजी प्रभुणे साहेब भाजप जिल्हा अध्यक्ष शंकर भाऊ जगताप आमदार अश्विनीताई जगताप यांच्या शुभहस्ते आणि श्री हेमंत हरभरे श्री विलासजी लांडगे श्री संदीप जी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चित्र रेखाटा अशी स्पर्धा पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये घेण्यात आली होती या स्पर्धेत चित्र रेखाटलेल्या तीन स्पर्धकांना प्रथम क्रमांक 3000 रुपये द्वितीय क्रमांक 2000 रुपये तृतीय क्रमांक 1000 रुपये या पद्धतीने बक्षिसे देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
*समाजातील आई-वडील नसलेले किंवा वडील नाहीत परंतु आई अत्यंत कष्टाचे काम करते किंवा आई-वडील आहेत परंतु दोघेही अपंग आहेत अशा इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या निराधार विद्यार्थ्यांना 12 हजार रुपये दरवर्षी याप्रमाणे शैक्षणिक मदतीची सुरुवात दोन विद्यार्थ्यांना मदत देऊन करण्याचे घोषित करण्यात आले. ही मदत देण्यासाठी काळभोर नगर येथील युवा कार्यकर्ते मोहन यशवंत काळभोर यांनी पुढाकार घेतला आणि दोन विद्यार्थ्यांचे पालकत्व घेतले. या गोष्टीला प्रेरित होऊन भाजप जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांनी देखील आणखी अशा तीन विद्यार्थी यांचा शैक्षणिक खर्च माझ्याकडून घेण्यात यावा असे व्यासपीठावरून जाहीर केले. एकूणच अशा पाच विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी शैक्षणिक खर्चासाठी सहकार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून आणि भाजप जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ जगताप तसेच काळभोर नगर येथील युवा कार्यकर्ते मोहन काळभोर यांच्या निधीतून दिला जाणार आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रमाची घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात करण्यात आली.
*माणिकराव बारगळ, पुरस्कार विजेते बाबा कांबळे, आमदार अश्विनीताई जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ जगताप त्याचप्रमाणे पद्मश्री गिरीशजी प्रभुणे साहेब या मान्यवरांनी कार्यक्रमाच्या दरम्यान आपापली मनोगत ही व्यक्त केली.
*पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती सदस्य राजाभाऊ घोडके यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
*यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील आधारित अत्यंत चांगल्या अशा सुमधुर गीतांचा कार्यक्रम अत्यंत आनंदात पार पडला.
*यानंतर आलेल्या सर्व अहिल्यादेवी भक्तांनी मनमुराद भोजनाचा आनंद लुटला आणि सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.
*हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष धनंजय तानले व मा. नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक खरात, अजय दूधभाते, मनोज मारकड, बंडू मारकड, गणेश खरात, काळूराम कवितके, गोविंद वलेकर, महादेव कवितके, सूर्यकांत गोफणे, गजानन वाघमोडे, महावीर काळे, अभिजीत शेंडगे, परमेश्वर उगारे, संजय कवितके, संजय नाईकवडी, तेजस्विनी दुर्गे, पल्लवी मारकड, आशा काळे, सोनाताई गडदे, रेखा दूधभाते, सुवर्णा सोनवलकर, राजेंद्र गाडेकर, बिरु व्हनमाने, विठ्ठल देवकाते, भारत मदने, संतोष पांढरे, संतोष रुपनर, नवनाथ देवकाते, सुनील बनसोडे, हिराकांत गाडेकर, दत्ता मोसलगी, बाबीर मेटकरी, बंडू लोखंडे,आंबादास पडळकर, राजू धायगुडे व आदि सदस्यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विना सोनवलकर आणि अजय चौगुले यांनी केले.*