पिंपरी चिंचवडराजकीय
पिंपरी विधानसभेत शरद पवार गटा कडून सुलक्षणा शीलवंत यांना उमेदवारी जाहीर
तुतारी वाजणार की घड्याळ?


पिंपरी :पिंपरी विधानसभेत अखेर निष्ठावंत सुलक्षणा शिलावंत -धर यांना शरद पवार गटा कडून उमेदवारी जाहीर

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली उमेदवारी
– महायुतीचे आण्णा बनसोडे विरुद्ध सुलक्षणा शिलवंत लढत
पिंपरी विधानसभेत तुतारी वाजणार की मशाल पेटणार? यावरून गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक अफवांचा बाजारही काहीजण पसरवत होते. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांकडून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून अण्णा बनसोडे विरुद्ध शरदचंद्र पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत अशी थेट लढत या मतदारसंघात होणार आहे.