पिंपरी चिंचवडराजकीय

मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार सोहळा थाटात संपन्न

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचा 'वसंतराव काणे' आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने गौरव* 

Spread the love

 

 

पिंपरी : सेलू येथे राज्यस्तरीय आदर्श जिल्हा पत्रकार संघ व आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुकाध्यक्षांचा मेळावा शनिवार 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार ‘पिंपरी चिंचवड पत्रकार संघाला देऊन गौरविण्यात आले.

मराठी पत्रकार परिषद आयोजित रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि अध्यक्षांचा मेळावा परभणी जिल्ह्यातील सेलू येथे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात संपन्न झाला.

याप्रसंगी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, प्रमुख वक्ते तथा प्रसिद्ध निवेदक विशाल परदेशी, स्वागताध्यक्ष विनोद बोराडे, परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूर शेख, विजय जोशी, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, सुनील वाळुंज, सह प्रसिद्धीप्रमुख भरत निगडे, महिला आघाडी अध्यक्षा शोभा जयपूरकर, डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, मुंबई मराठी पत्रकार संघ अध्यक्ष दीपक कैतके, अक्रिटेशन कमिटी राजा आदाते, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, पुणे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, परिषद प्रतिनिधी एम जी शेलार, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले, अध्यक्ष डिजिटल मीडिया पिंपरी चिंचवड विनय सोनवणे, महावीर जाधव, राकेश पगारे, कार्याध्यक्ष अविनाश आदक, संतोष गोतावळे, रामकुमार शेडगे यांसह राज्यभरातून सर्व जिल्हा व तालुका पत्रकार संघ प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट

*राज्यभर पत्रकारांच्या प्रश्नांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार – एस. एम. देशमुख*

पत्रकारांच्या प्रश्नासाठी मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला. पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा व्हावा, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. अखेर सरकारने २०१७ मध्ये पत्रकार संरक्षण कायदा केला. पण प्रत्यक्षात या कायद्याची अंबलबजावणी होत नाही. कारण या कायद्याचे नोटिफिकेशन निघाले नाही. पत्रकार संरक्षण कायद्यासह सरकार पत्रकारांच्या इतर प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठी पत्रकार परिषद राज्यभर रस्त्यावर उतरून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करणार आहे. असा इशाराच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button