बौद्धजन विकास समितीची संविधान अमृत महोत्सव सन्मान समितीची प्रथम मीटिंग उत्साहात संपन्न झाली.
उपक्रमासाठी भारतीय बौद्धजन विकास समितीचे सदस्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले!


भारतीय बौद्धजन विकास समिती, पिंपरी-चिंचवड पुणे यांच्या पुढाकाराने संविधान अमृत महोत्सव सन्मान समितीची प्रथम मीटिंग उत्साहात संपन्न झाली. या समितीचा मुख्य उद्देश म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधान अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि संविधानाच्या महत्त्वाची जाणीव प्रत्येक भारतीयाला होणे हा आहे. त्यासाठी संविधानाचा प्रचार-प्रसार करण्यात येईल, तसेच संविधानाच्या प्रस्ताविके ची प्रत जास्तीत जास्त समाज संघटना पर्यंत पोहोचवण्याचा हेतू ठेवण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “मी कोणत्या धर्माचा आहे हे सांगण्यापेक्षा मी एक भारतीय आहे हे सांगणं सर्वप्रथम महत्त्वाचं आहे.” त्यांच्या या विचारांचा प्रसार करताना समितीने सर्व धर्माचे, जातींचे आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणून संविधानाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
या उपस्थित सदस्यांनी ठरविले की, या वर्षभरात संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या माध्यमातून प्रत्येक जाती-धर्मातील नागरिकाना संविधानाचे महत्व पोहोचवणे आणि त्यातून त्यांना संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार यांची ओळख करून जागृती करणे हे या कार्यक्रमांचे ध्येय असेल.
आज पिंपरी- येथील घरोंदा हॉटेलमध्ये समितीची पहिली बैठक झाली. या बैठकीत सर्व उपस्थितांनी संविधानाच्या जागरूकतेसाठी कटिबद्ध होण्याचा निश्चय केला. वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सर्व धर्मीय आणि समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी सहभाग घेतील व संविधानाचे महत्त्व त्यांच्या समुदायापर्यंत पोहोचवतील.
या अभिनव उपक्रमासाठी भारतीय बौद्धजन विकास समितीचे सदस्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले! संविधानाचा सन्मान आणि त्याविषयीची जागरूकता जनसामान्यांपर्यंत पोहोचेल, याचा विश्वास आहे.