पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रराजकीय

कामगारांच्या हिताचा विचार; म्हणून महेशदादांसोबत!  

एकजुटीने आमदारांची हॅट्रिक साधणार 

Spread the love

 

 

शहरातील विविध कामगार संघटनांचा निर्धार 

 

 

पिंपरी-चिंचवड :प्रस्थापित यंत्रणा डोंगरासारख्या असतात. आपण त्यांना कितीही धडका मारल्या तरी या यंत्रणा हलत नाहीत. म्हणून आमदार महेश लांडगे यांच्यासारखा भक्कम पाठींबा आपल्या कामगारांच्या पाठीशी असणे महत्त्वाचे आहे. आमदार महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षात कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. कामगार एकजुटीतून आमदार महेश लांडगे यांच्या हॅट्रिकची संधी आपण त्यांना मिळून देणार असल्याचा निर्धार कामगार संघटनांच्या मेळाव्यात करण्यात आला.

साधूराम गार्डन, मंगल कार्यालय मोशी येथे पार पडलेल्या भोसरी मतदार संघातील संघटीत व असंघटीत कामगार बांधवांनी आमदार महेश लांडगे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे.

कामगारांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. संघटित, असंघटित क्षेत्रामध्ये काम करताना कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गेल्या अनेक वर्षात कामगार क्षेत्रामध्ये प्रस्थापित यंत्रणांनी कामगार विषयक भूमिकांचे धोरण तकलादू ठेवले आहे. भाजपचे शासन आल्यानंतर कामगारांचा, कामगार धोरणांचा विचार सुरू झाला. मोदी सरकारने अकुशल कामगारांपासून , स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या घटकांचा विचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना आणली यातून कौशल्य विकास करण्याबरोबरच स्टायपेंड देणे सुद्धा सुरू केले.

असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ झाला असून या योजनेमध्ये बांधकाम कामगार, घरेलू कामगार,माथाडी कामगार, सुरक्षारक्षक अशा सर्वांना वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. कामगारांच्या सर्व स्तरीय बाजूंचा विचार करणारे सरकार आपल्याला हवे आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार विधिमंडळात असणे गरजेचे आहे त्यासाठीच आपल्याला महेश लांडगे यांना पाठिंबा द्यायचा आहे, असा संकल्पही कामगारांनी केला आहे.

भाजप, शिवसेना महायुतीची धोरणे ही कामगारांना पूरक अशी आहेत .कामगारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत .कौशल्य विकास उपक्रम राबवत असंगठीत कामगारांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचे काम भाषण शासनाने केले आहे. त्यामुळे प्रत्येक कामगारांना न्यायची भूमिका ठेवणाऱ्या भाजप व आमदार महेश लांडगे यांना कामगारांच्या एकजुटीतून आपल्याला पुन्हा एकदा विधिमंडळात पोहोचवायचे आहे. भोसरी मतदारसंघातून आमदार महेश लांडगे यांची हॅट्रिक आम्ही कामगारांनी पक्की केली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी पूर्ण ताकदीने महेश लांडगे यांना मतदान करण्याचे आवाहन प्रत्येक कामगार करणार आहे . तर आम्हा कामगारांना महेश लांडगे यांनी पुढची पाच वर्ष कामगारांसाठी देणार असल्याचा विश्वास देखील दाखवला आहे यातून महेश लांडगे यांची हॅट्रिक नक्की आहे.

– इरफान सय्यद, उपनेते, शिवसेना.

 

कामगारांनी मागील दहा वर्षात त्यांच्यासाठी केलेली कामे माझ्यासाठी आठवावीत आणि इतरांना ती सांगावी. कामगारांनी फक्त दोन तास पुढील २० तारखेपर्यंत माझ्यासाठी द्यावेत. यांच्यासोबतच्या 25 नागरिकांना त्यांनी याबद्दल सांगावे. पुढची पाच वर्ष मी समस्त कामगार बांधवांच्या पाठीशी मी कायमस्वरूपी उभा राहीन असा ठाम विश्वास मी देतो .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button