जिजाऊ रथयात्रेचे पिंपरी चिंचवडमध्ये शहरांमध्ये जोरदार स्वागत…….🚩🚩🚩


पिंपरी चिंचवड (लोकजागृती ) :मराठा सेवा संघाच्या वतीने रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले.मराठा जोडो अभियान सुरू असून या अंतर्गत सर्व जातीधर्मात सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, या उद्देशाने ‘जिजाऊ रथ यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. १८ मार्च २०२५रोजी वेरूळ येथून निघालेली ही यात्रा आज आपल्या पिंपरी चिंचवड शहरात पोहोचली. या रथयात्रेची सुरुवात डांगे चौक, चाफेकर चौक, चिंचवड स्टेशन, अहिल्याबाई होळकर पुतळा मोरवाडी, नेहरूनगर, शिवाजी पुतळा लांडेवाडी, शिवाजी पुतळा भोसरी गावठाण, संत तुकाराम नगर, आंबेडकर पुतळ्याला रथयात्रेचा समारोप झाला.

या यात्रेचे सहर्ष स्वागत करत स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ, संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ यांनी रथयात्रेचे आयोजन केले होते.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव श्री सौरभदादा खेडेकर, मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष श्री आबासाहेब ढवळे मा. नगरसेवक अभिषेक बारणे, श्री. नवीन तापकीर, श्री. अर्जुन तनपुरे सर, श्री. प्रकाश जाधव, श्री. अभिमन्यू पवार, श्री. मनोज गायकवाड, आमदार शंकर जगताप, उमा खापरे यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते. एक मे 2025 रोजी पुण्यात लाल महाल येथे रथयात्रा समाप्त होईल.