पिंपरी चिंचवड शहरातील पवना,इंद्रायणी, मुळा नद्या वाचवण्यासाठी जागृत नागरिक रस्त्यावर!


पिंपरी चिंचवड :पिंपरी चिंचवड शहरातील पवना, इंद्रायणी मुळा या नद्यांचे प्रदूषण रोखणे, तसेच नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली हजारो वृक्ष तोडून जॉगिंग ट्रॅक बनवणे यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी, जल शुद्धीकरण प्रकल्पांचे बोगस काम बंद करून ते पारदर्शक व प्रभावी व्हावे. नद्यांची प्रदूषण पातळी कमी व्हावी. या प्रमुख मागण्यांसाठी शहरातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने चिंचवडगाव येथील चाफेकर चौकात हातात विविध जनजागृती फलक घेऊन मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले.

या जनजागृती आंदोलनात शहरातील विविध पर्यावरणवादी संघटना, वृक्षप्रेमी संघटना, सामाजिक संस्था संघटना व नागरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात आम्हीही सहभागी झालो होतो.
पुढच्या काळात या गंभीर व अत्यंत महत्त्वाच्या विषयावर या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर आम्ही काम करणार आहोत.या आंदोलनात शहरातील जागृत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा ही विनंती.