पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांचा अभिमान ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ चे पाद्यपूजन

हिंदूत्ववादी आमदार महेश लांडगे यांची संकल्पना

Spread the love

 

 

तमाम शिव-शंभू प्रेमींच्या संकल्पाची अखेर पूर्तता

पिंपरी :हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यातील शिव-शंभू प्रेमी युवकांचे प्रेरणास्थान म्हणून नावारुपाला येणाऱ्या या ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ चे पाद्यपूजन आज विधीवत करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे नेते तथा प्रखर हिंदूत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून बोऱ्हाडेवाडी- मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. या पुतळ्याच्या चौथऱ्याचे झाले आहे. त्यामुळे पुतळा ज्या ठिकाणी उभारला जणार आहे. त्या ठिकाणी पाद्यपूजन करण्यात आले. यावेळी मोशी-बोऱ्हाडेवाडीतील ग्रामस्थ यांच्यासह शिव-शंभू विचारांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ अर्थातच छत्रपती संभाजी महाराज यांचा सर्वात उंच पुतळा उभारण्याचे भाग्य लाभले, याचे समाधान वाटते. पिंपरी-चिंचवडकरांसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असा भव्य पूर्णाकृती पुतळा साकारत आहे. शंभू सृष्टीसुद्धा आहे. हा पुतळा हिंदू धर्म आणि संस्कृती संरक्षणाची कायम प्रेरणा देत राहील.

… असा आहे ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’

– छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याची १४० फूट उंची

– चौथऱ्यांची उंची ४० फूट

– सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा १० फूट

– सरदार आणि मावळे एकूण १६ पुतळे प्रत्येकी १० फूट

– ओपन एअर थिएटर, प्रमुख प्रसंगांवर आधारित ब्राँझ म्यूरल्स

शंभुराजांची गाथा ऐकण्यासाठी एलईडी स्क्रीन

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’चे काम प्रगतीपथावर आहे. महाराजांच्या पुतळ्याचे पाद्यपूजन करण्यात आले. योगायोगाने आजपासूनच आपल्या राजाचा बलिदान मास सुरू होतो आहे. ‘‘देव-देश अन्‌ धर्मासाठी मरावे कसे..?’’ याची शिकवण देणाऱ्या महाराजांचे कार्य अजरामर आहे. चंद्र-सूर्य असेपर्यंत या कार्याची महती कायम राहील. शंभूराजांच्या कार्याची प्रेरणा सदैव या शंभूसृष्टीमधून मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button