पिंपरी चिंचवडशिक्षण

ज्ञान प्रबोधिनी पालक संघातर्फे ‘वॉकेथोन’

सुमारे १५०० पालकांची एकत्र चाल : कुटुंब संस्कृती अन्‌ आरोग्याचा संदेश

Spread the love

 

 

 

पिंपरी चिंचवड :ज्ञान प्रबोधिनीच्या पालक महासंघाने कुटुंब संस्कृती आणि कुटुंबाचे आरोग्य या विषयांसाठी ‘वॉकेथोन’चे आयोजन केले होते. स्वामी विवेकानंद जयंतीच्यानिमित्ताने पालकांनी एकत्र येऊन कुटुंब संस्कृतीचा आगळा वेगळा महोत्सव साजरा केला. वय वर्षे २ ते वय वर्षे ९० अशा सर्व वयोगटातील सदस्य यामध्ये सहभागी झाले होते. १ किमी, ३ किमी, ६ किमी अशा तीन गटात हे सदस्य सहभागी झाले होते.

 

विद्यमान विधानपरिषद आमदार अमित गोरखे, एव्हरेस्ट वीर सागर पालकर, एव्हरेस्ट वीर शरद कुलकर्णी, उद्योजक प्रसाद कुलकर्णी, युवा नेते जयदीप खापरे यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या विद्या उदास यांनी सर्वांचा झुंबा व्यायाम घेत वातावरण चैतन्यमय केले.

पालक संघ मार्गदर्शक आदित्य शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर पालक, युवक आणि युवतींच्या गटाने हे वीर विवेकानंद हे गीत सादर केले. पालक महासंघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

कुटुंब संस्कृती जपण्याचे आवाहन

आमदार अमित गोरखे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. ज्ञान प्रबोधिनी ही या परिसराची मातृत्व असलेली संस्था असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र प्रमुख मनोज देवळेकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि कुटुंब संस्कृती जपण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button