पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रराजकीय

आपल्या मुलांच्या सहा लाख नोकऱ्या खाणाऱ्यांना घरी बसवा – सुप्रिया सुळे

तळेगावात आलेला फॉक्सकॉन प्रकल्प भाजपने गुजरातला पळवला -सुप्रिया सुळे

Spread the love

 

 

विरोधकांच्या धमक्यांना घाबरू नका, वेळेवर करेक्ट कार्यक्रम करू- सुप्रिया सुळे 

 

महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी थांबवण्यासाठी महायुतीला हद्दपार करा -सुप्रिया सुळे

 

पंधराशे देऊन दाम दुपटीने महागाई वाढवणाऱ्यांना महिला शक्तीच घरी बसवेल -सुप्रिया सुळे

 

भोसरी 11 नोव्हेंबर: 

 

आमचा संघर्ष वैयक्तिक नाही. महागाई, बेरोजगारी, अधिकार आणि भ्रष्टाचार या विरोधात आमची लढाई आहे. तळेगावात आलेला फॉक्सकॉन प्रकल्प भाजपने ओढून नेला. सहा लाख नोकऱ्या या भागातल्या मुलांना मिळणार होत्या. आमच्या मुलांच्या सहा लाख नोकऱ्या तुम्ही खाल्ल्या, तुम्हाला घालवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. पंधराशे रुपये देऊन दाम दुपटीने महागाई करणाऱ्या सरकारला महिला शक्तीच घरी बसवणार आहे असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे सोमवारी (दि.11) महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ महिलांची उल्लेखनीय उपस्थिती होती.यावेळी महिलांनी राम कृष्ण हरी वाजवा तुतारी असा जयघोष केला. व्यासपीठावर पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर मोहिनी लांडे, माजी आमदार विलास लांडे, उमेदवार अजित गव्हाणे, शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, माजी नगरसेविका विनया तापकीर आदी उपस्थित होते. मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेविका प्रियंका बारसे, संगीता ताम्हाणे, माई काटे, स्वाती साने, स्वाती चिटणीस, रूपाली आल्हाट, मंदा आल्हाट, शुभांगी बोऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त केले

सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या, ही निवडणूक वैयक्तिक संघर्षासाठी नाही, तर आपल्या अधिकारांसाठी आहे. वाढती महागाई ,बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम तेलाचे भाव आवाक्यात आणू असे आश्वासन दिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे .रोजच्या जगण्यातले प्रश्न आम्हाला माहित आहे .त्यामुळे महिलांनी निर्धास्त होऊन महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महागाईच्या मुद्द्यानंतर या राज्यातील वाढती बेरोजगारी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या दहा वर्षात या प्रश्नाची गुंतागुंत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपल्या राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात पळवले जात आहे. दुसऱ्या राज्यात प्रकल्प नेण्याबद्दल दुमत नाही. मात्र आमच्या मुलांच्या ताटातला घास हिसकावून नेण्याची भाजपची वृत्ती निंदनीय आहे. तळेगावात आलेला फॉक्सकॉन प्रकल्प यांनी गुजरातला पळवला आमच्या मुलांच्या ताटातला घास काढून नेण्याचे पाप या भाजपने केलेले आहे.

आज हा प्रकल्प सुरू झाला असता तर आमच्या भागातील तरुणांना सहा लाखांहून अधिक नोकऱ्या मिळाल्या असत्या. आमच्या मुलांच्या नोकऱ्या खाणाऱ्या या भाजपच्या उमेदवारांना त्यामुळे घरी बसवायचे आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना त्यांचे अधिकार देऊन सन्मान, स्वाभिमान जपण्याचे काम केले जाणार आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. म्हणूनच येत्या 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या क्रमांकाचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे महत्त्वाचे काम आपल्या महिला शक्तीने करायचे आहे असे आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी केले.

……..

20 नोव्हेंबरनंतर माझे खरे रूप दाखवीन असे म्हणणाऱ्या आमदार महेश लांडगे यांना सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता चांगले सुनावले. बघून घेण्याची भाषा कोणाला करता महिला शक्तीचे खरे रूप तुम्हाला अजून माहित नाही. वेळ येऊ द्या टप्प्यात करेक्ट कार्यक्रम करू असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

……………

 

दोन हजार कोटींचा खर्च करून ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद काढून घेण्याचे पाप


महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेण्यासाठी चाळीस आमदारांची 50 खोके देऊन खरेदी केली गेली. दोन हजार कोटी खर्च करून आमदारांना विकत घेतले असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. दोन हजार कोटींचा खर्च करून उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद काढून घेण्याचे पाप भाजपने केले. उद्धव ठाकरे यांना पदावरून खाली खेचणाऱ्यांना घरी बसवा असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.

……….. म्हणून अजित गव्हाणे यांना निवडून आणणा

अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी महायुतीचा खरपूस समाचार घेतला.महिला सुरक्षा, महागाई, लाडकी बहीण योजना यावरून सत्ताधाऱ्यांचे चांगलेच वाभाडे काढले. पंधराशे रुपये देणार आणि दाम दुपटीने महागाई वाढवून ठेवणार त्यामुळे हे सरकार घालवायचे आहे असे महिला शक्तीने यावेळी ठणकावून सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी भोसरी विधानसभेतून अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करणार असा निर्धार महिलांनी व्यक्त केला.

आगामी काळामध्ये महाविकास आघाडीला अपेक्षित असणारे काम शहरांमध्ये करायचे आहे. या शहरातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाचा दर्जा सुधारायचा आहे. नामांकित शिक्षण संस्था आपल्या शहरात आल्या पाहिजेत या दृष्टीने पावले टाकायची आहेत. महिला भगिनींना सुरक्षित वातावरण देण्याबरोबरच युवकांच्या हाताला काम देणे ही महत्त्वाची जबाबदारी असणार आहे ‘स्मॉल क्लस्टर’ची उभारणी शहरात करण्यासाठी प्रयत्न करणार आहे……….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button