अपक्ष उमेदवार कमल व्यवहारे यांचा प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर
अपक्ष उमेदवार रींगणात!


पुणे(लोकजागृती ):२१५ कसबा विधानसभा मतदारसंघांमधून अपक्ष उमेदवार म्हणून कमल ज्ञानराज व्यवहारे निवडणूक लढवत असून दीपावली पाडवा सणानिमित्त मतदार संघामधील सर्व भागातील तरुण मंडळांना प्रत्यक्ष भेटीगाठी देत तेथील युवा कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनींशी संपर्क साधत त्यांना दीपावली सणाच्या शुभेच्छा देऊन सणाचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणीत केला आहे, तसेच येथील हॉटेल कल्पना कट्टा मधील स्नेह मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आकाश कंदील उडवत जनसामान्यांची दिवाळी हीच आपली दिवाळी समजून दीपावली सण साजरा केला आहे साधी राहणी उच्च विचार अशी विचारसरणी असलेल्या कमल व्यवहारे यांना पुण्याच्या राजकारणामधील 40 वर्षाचा अनुभव व गेली २५ वर्षापासून पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पदाचा चांगला अनुभव असून मतदार संघामधील समस्यांची त्यांना चांगल्या प्रकारे जाण आहे,जनमानसामध्ये त्यांच्या कामाचा चांगला बोलबाला असून ज्या पद्धतीने पुण्याच्या पहिल्या महिला महापौर म्हणून त्यांनी काम करून आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यपद्धतीचा ठसा उमटविला त्याच पद्धतीने कसबा विधानसभा मतदारसंघांमधून आमदार म्हणूनही निवडून देऊ असा विश्वास ठिकठिकाणी सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांना देण्यात येत आहे.
