फेरीवाल्यांच्या हिताचे,हक्काचे काम करणाऱ्या आपल्या पॅनलला विजयी करा – काशिनाथ नखाते
पॅनलला कप बशी या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करावे


पिंपरी दि.१४ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती, महासंघ कष्टकरी संघर्ष महासंघ या संघटनाच्या माध्यमातून शहरातील कष्टकरी वर्ग, पथारी,हातगाडी, टपरीधारक यांच्या न्यायहक्काची लढाई आम्ही लढलेली आहे आमच्या लढाईमुळे हॉकर्स झोन निर्माण केले, ६५ ठिकाणी हॉकर झोन प्रस्तावित असून २०१४ नंतर ५९०० विक्रेत्यांना फेरीवाला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यापुढेही खूप मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी सर्व पथारी,हातगाडी, टपरीधारकानी आपल्या संघटनेच्या सर्व उमेदवारांना कपबशी या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहु मताने विजयी करावे अशी विनंती महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ मध्ये नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ, फेरीवाला हॉकर्स महासंघाच्या सुमारे२२ वर्षापासून लढणाऱ्या संघटनांचे अधिकृत उमेदवार
हे आहेत त्यांच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी अनेक वेळा संघर्ष केलेला असून प्रसंगी अनेक वेळा कार्यकर्ते तुरुंगामध्ये गेलेले आहेत संघर्ष यातून आम्ही अनेक निर्णय करून घेतलेले आहेत
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये पथारी हातगाडी टपरी धारकांना सन २०१२आणि २०१४ मध्ये संघटनेच्या माध्यमातून पाठपुराव्यातून सर्वेक्षण करण्यात आले त्यानंतर ५९०० विक्रेत्यांना लायसन वाटपाची प्रक्रिया झाली आताही आम्ही केलेल्या प्रयत्नातून सर्वेक्षण झालेले आहे त्यानंतर आता सर्व क्षत्रिय कार्यालयामध्ये १४०० रू. शुल्क आकारणी सुरू आहे त्या सर्व विक्रेत्यांना ओळखपत्र व फेरीवाला प्रमाणपत्र मिळणार आहे. आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निगडी येथे सुसज्ज असे हॉकर्स झोन , खाऊ गल्ली केलेली असून भक्ती शक्तीसह इतर ठिकाणी हॉकर झोनची निर्मिती करण्यात यश आलेले आहे. पुढील कालावधीमध्ये सुसज्ज भाजी मंडई व फेरीवाल्याचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या न्यायासाठी आम्ही प्रयत्नशील राहू म्हणून रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत आपल्या क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असणाऱ्या नियोजित शाळांमध्ये मतदान करून महासंघाचे पॅनलला कप बशी या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. उमेदवार सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते उमेदवाराने आपल्या भूमिका मांडल्या. महासंघाचे पदाधिकारी सचिव तुषार घाटोळे,निमंत्रक बालाजी लोखंडे,नाना कसबे ,रवींद्र गायकवाड, हरित शेख, मनोज यादव, यासीन शेख, संभाजी वाघमारे, तुकाराम माने, नवनाथ जगताप, सुरेश नवगिरे, कारण भोसले, सतीश भोसले ,कमल लष्करे आदी उपस्थित होते.