पिंपरी चिंचवडउद्योग विश्व

अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन, भूमिपूजन, लोकार्पणसोहळा

Spread the love

पिंपरी,दि.८ ऑक्टोबर २०२४:(लोकजागृती -* राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता पासून पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भुमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.

शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भुमिपूजन या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभाणार आहे. तसेच केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भूषविणार आहेत. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, सुनील शेळके, सिद्धार्थ शिरोळे, तसेच पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे अशी माहिती अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली असून या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह महापालिकेचे माजी नगरसदस्य,नगरसदस्या, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक य उपस्थित राहणार आहेत.

 

या लोकार्पण व भुमिपुजन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता बोपखेल येथे मुळा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याने होणार आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने स्थायी आदेश पुस्तिकेचे प्रकाशन व नवीन शासकीय वाहनांना हिरवा झेंडा दाखविण्याचा कार्यक्रम होणार आहे. इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल (iccc)चे लोकार्पण होईल. त्यानंतर निगडी प्राधिकरण येथे हरित सेतू विषयक कामांचे लोकार्पण होणार असून त्यानंतर पिंपळे सौदागर येथील पवना नदीवर उभारलेल्या पुलाचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर रक्षक चौकात सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर सबवे उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका व पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुला नदीकाठ सुधारणा प्रकल्प टप्पा १ चे शुभारंभ होणार आहे. त्यानंतर मुळा नदीवरसांगवी ते बोपोडी दरम्यान उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

 

सकाळी ९.३० वाजता सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे महापालिकेच्या वतीने उभारलेल्या व प्रस्तावित असलेल्या विविध विकास प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन, भूमिपूजन, लोकार्पण समारंभ व सभा संपन्न होणार आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button