पिंपरी चिंचवड

हवा प्रदूषणासाठी कारणीभूत दोन आरएमसी प्लँट चालकाला ‘दणका

Spread the love

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचे मंत्र्यांना पत्र

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात हवा प्रदूषणाची पातळी वाढली असून, ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून, वाकड परिसरात हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या दोन आरएमसी प्लँट चालकांना नोटीस बजावली आहे. तसेच, संबंधित प्लँक कायमस्वरुपी बंद करण्याचा इशारा दिला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने शहरातील हवा प्रदूषणाच्या मुद्यावर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना आमदार महेश लांडगे यांनी पत्राद्वारे कारवाईची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी वाकड-ताथवडे- पुनावळे आणि हिंजवडी परिसरातील आयटीएन्सनी हवा प्रदूषणाच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सजीवांसाठी धोकादायक पातळीजवळ आहे. याबाबत महानगरपालिकेच्या पथकाने पाहणी केली. त्यामध्ये संबंधित आरएससी प्लँटमुळेच मोठ्या प्रमाणात धूळ येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने निर्धारित केलेल्या कोणत्याही अटी व शर्तीचे पालन केले जात नाही, अशी बाब समोर आली आहे. महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेली आहे.

*****

 

फौजदारी गुन्हा दाखल करणार! 

महानगरपालिका अधिनियम, कलक 214 अनुसरुन पर्यावरणास हानी पोहोचवणारा आपला आरएसमसी प्लँट सील का करण्यात येवू नये? याबाबत 3 दिवसांत लेखी स्वरुपात कळवावा. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 376 (अ) नुसार फौजदारी गुन्हा दाखल करुन आपल्या उद्योगामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होत असल्याने आपला आरएमसी प्लँट कायमस्वरुपी बंद करण्यात येईल, अशी नोटीस प्रशासनाने संबंधितांना पाठवली आहे.

वाढते नागरिकरण आणि पर्यावरण संवर्धन याचे आव्हान मानवजातीसमोर आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील हवा प्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस धोकादायक पातळीच्या दिशेने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी, कुदळवाडी येथील भंगार दुकानांवर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये हवा प्रदूषण, नदी प्रदूषण हा कळीचा मुद्दा होता. सामान्य नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवनमान देण्यासाठी प्रशासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आरएमसी प्लँटधारकांसह विविध व्यावसायिक, उद्योजकांनीही प्रदूषणाच्या मुद्यावर सतर्क आणि जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button