पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

३ अनधिकृत आरसीसी बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली

Spread the love

पिंपरी, दि.१३ सप्टेंबर २०२४ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालय हद्दीत थेरगाव येथील आनंदवन सोसायटीतील अंदाजे १२१८ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या ३ अनधिकृत आरसीसी बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

ग क्षेत्रीय कार्यालयामार्फत ही कारवाई करण्यात आली असून आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी उप अभियंता एस.के.अहिरे, धडक कारवाई पथकातील बीट निरीक्षक सौरभ शिरसाठ, मितुष सावंत, किरण पवार आणि विनोद बजबळकर, अतिक्रमण निरीक्षक मनिष जगताप, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १५ जवान, ३ पोलीस उपनिरीक्षक, १८ पोलीस कर्मचारी, ५ ठेकेदार मजूर आदी सहभागी होते. या कारवाईसाठी जेसीबी ब्रेकर, हातोडा तसेच ट्रॅक्टर ब्रेकरचा वापर करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button