पिंपरी चिंचवडसामाजिक

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी

अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले

Spread the love

पिंपरी, दि. १ सप्टेंबर २०२४:- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या दानशूर, न्यायनितीनिपुण तसेच कुशल प्रशासक तर होत्याच याशिवाय त्यांनी राज्यकारभार पाहत असताना देशभरात लोकोपयोगी सोईसुविधांची हजारो कामे केली आणि अनेक वर्षे राज्याचा कारभार सांभाळताना एक सक्षम व आदर्श राज्य देखील निर्माण केले, त्यांच्या महान कार्याचा आणि देशभक्तीचा वारसा सर्वांनी जोपासावा असे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस आणि मोरवाडी चौक तसेच सांगवी येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्य प्रशासकीय इमारतीमधील तसेच मोरवाडी येथील कार्यक्रमास माजी नगरसदस्य राजू दुर्गे, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता विजय भोजने, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण रूपनर,सदाशिव पडळकर, भुजंग दुधाळे,धनंजय तानले, दिपक भोजने,तेजस्विनी दुर्गे, महावीर काळे, नवनाथ देवकाते, धनंजय गाडेकर,गोविंद गोरे, विश्वनाथ खंडाळे,अमोल कांबळे,नाना कांबळे आदी उपस्थित होते.

तर सांगवी येथील कार्यक्रमास उप आयुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष नवनाथ बीडे, सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू गाडेकर, सुधाकर सूर्यवंशी, अजय दूधभाते , संदीपान सामसे, प्रफुल्ल भावेकर, हरिश्चंद्र गायके , दगडू घोटके,माणिक देवकाते, कल्याण बोकडे, कृष्णराव गिरगुणे, मारुती भालेकर ,मारुती भंडारे विलास पाटील, शरद टेकाळे नारायण भुरे, ज्ञानदेव भगत, छगन वाघमोडे,ज्ञानेश्वर वाघमारे, विनायक पिंगळे, दादासाहेब देवकाते, बबन शेंडगे, मनोज मार्कड, दिलीप तनपुरे, सचिन सरग,बिरू व्हनमाने,अंकलेश सरोदे आदी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट जारी केले आहे,तर त्यांच्या नावाने विमानतळ,जिल्हा,विद्यापीठ तसेच अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्था देखील आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button