पुणे

८० उद्योजकच्या उपस्थित bvg मध्ये शिकाऊ प्रशिक्षण योजनेचा लाभ

शिक्षीत युवांचा रोजगाराचा संधी

Spread the love

 पुणे :शिक्षीत युवांचा रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी भारत सरकारने शिकाऊ प्रशिक्षणाच्या (अप्रेंटिसशिप) अनेक योजना सुरु केल्या आहेत. उद्योगक्षेत्राने उच्चशिक्षीत युवकांना राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजने (NATS) अंतर्गत, प्रशिक्षणार्थी कामावर रुजू झाल्यानंतर प्रशिक्षण दिल्यास दरमहा ४५०० रुपये केंद्रशासनाच्या वतीने देण्यात येतात. त्यामुळे उद्योगांचा मासिक वेतनावर होणारा खर्च २५ ते ३० टक्क्यांनी कमी होतो. असे प्रतिपादन बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग विभागाचे संचालक पी. एन. जुमले यांनी केले. बीव्हीजी इंडीयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “इंडस्ट्री एच.आर मिट” या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी बीव्हीजी इंडियाचे अद्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक हणमंतराव गायकवाड, कॉरपोरेट अफेअर्स विभागाच्या वैशाली गायकवाड व अप्रेंटिस विभागाचे रवी घाटे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमासाठी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील ८० उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी ॲप्रेंटिसशीप ट्रेनिंग विभागाचे उपसंचालक एन. एन. वडोदे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली.

या वेळी गायकवाड म्हणाले,” भारत सरकारच्या कौशल्य विकास विभागासोबत बीव्हीजी इंडीयाचा करार झाला आहे. या करारामुळे युवकांना जगभरात रोजगाराच्या विविध संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्राने या योजनेचा परिपुर्ण लाभ घ्यावा.”

केंद्र शासनाची योजना प्रभावीपणे राबवण्यात सुजन कॉंटिटेक, प्रभा इंजिनिअरींग, जगदीश इलेक्ट्रॉनिक्स, रेनाटा प्रिसिजन, व संपदा संस्थाचा प्रामुख्याने समावेश आहे.

कार्यक्रमाचे आयोजन बीव्हीजी ॲप्रेटंसशिप विभागाचे विनोद धोमे, प्रमोद पवार, मंदार केळकर, रोहिणी जगताप व अतुल म्हस्के यांनी केले होते.

शिक्षीत युवांचा रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी भारत सरकारने शिकाऊ प्रशिक्षणाच्या (अप्रेंटिसशिप) अनेक योजना सुरु केल्या आहेत. उद्योगक्षेत्राने उच्चशिक्षीत युवकांना राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजने (NATS) अंतर्गत, प्रशिक्षणार्थी कामावर रुजू झाल्यानंतर प्रशिक्षण दिल्यास दरमहा ४५०० रुपये केंद्रशासनाच्या वतीने देण्यात येतात. त्यामुळे उद्योगांचा मासिक वेतनावर होणारा खर्च २५ ते ३० टक्क्यांनी कमी होतो. असे प्रतिपादन बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग विभागाचे संचालक पी. एन. जुमले यांनी केले. बीव्हीजी इंडीयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “इंडस्ट्री एच.आर मिट” या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी बीव्हीजी इंडियाचे अद्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक हणमंतराव गायकवाड, कॉरपोरेट अफेअर्स विभागाच्या वैशाली गायकवाड व अप्रेंटिस विभागाचे रवी घाटे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमासाठी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील ८० उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी ॲप्रेंटिसशीप ट्रेनिंग विभागाचे उपसंचालक एन. एन. वडोदे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली.

या वेळी गायकवाड म्हणाले,” भारत सरकारच्या कौशल्य विकास विभागासोबत बीव्हीजी इंडीयाचा करार झाला आहे. या करारामुळे युवकांना जगभरात रोजगाराच्या विविध संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्राने या योजनेचा परिपुर्ण लाभ घ्यावा.”

केंद्र शासनाची योजना प्रभावीपणे राबवण्यात सुजन कॉंटिटेक, प्रभा इंजिनिअरींग, जगदीश इलेक्ट्रॉनिक्स, रेनाटा प्रिसिजन, व संपदा संस्थाचा प्रामुख्याने समावेश आहे.

कार्यक्रमाचे आयोजन बीव्हीजी ॲप्रेटंसशिप विभागाचे विनोद धोमे, प्रमोद पवार, मंदार केळकर, रोहिणी जगताप व अतुल म्हस्के यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button