पुणे, पिंपरी चिंचवड रेड अलर्ट, शाळांनाही सुट्टी, राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतीमुसळधार कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज


पिंपरी चिंचवड शहराची आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात रात्रीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला आहे.गेल्या 12 तासांत तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पावसाने तुफान बॅटिंग केल्याने धरणाच्या पाणी साठ्यात12 तासांमध्ये थेट 10 टक्के वाढ झाली आहे

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर राज्यात अजूनही कायम आहे. हवामान विभागाने राज्यातील पुणे, सातारा, रायगड, पालघर, सांगली या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट आहे. पुणे, सांगलीत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन गुरुवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पुण्यात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश काढले आहेत.
*पुणे जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार आज प्रचंड पावसामुळे जिल्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.