पिंपरी चिंचवड

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व समन्वय बैठक संपन्न..

Spread the love

पिंपरी :दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन भक्ती शक्ती चौक, निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक येथे दि. १ ते ५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महापालिका अधिकारी,उत्सव समितीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या समन्वय बैठकीचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे करण्यात आले होते.

या बैठकीस उप आयुक्त अण्णा बोदडे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, कमल घोलप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता विजय वाईकर, वासुदेव भांडरे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप, जेजुरी संस्थान समितीचे अध्यक्ष अनिल सौंदडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अढागळे, संदीपान झोंबाडे, मनोज तोरडमल, सतिश भवाळ, दत्तू चव्हाण, डि.पी खंडाळे, योगेश लोंढे, सुनिल भिसे, अरूण जोगदंड, चंद्रकांत लोंढे, राजू जाधव, गणेश साठे, किरणकुमार पाटोळे, मयुर गायकवाड, शिवाजी चव्हाण, भीमराव बरकडे, अमर पुणेकर, गणेश साठे, शिवाजी चव्हाण, शहनाज कुर्णे, रामेश्वर बावणे, नानासाहेब कांबळे, मारूती काळे, बापुसाहेब वाघमारे, अक्षय उदगरे, भगवान शिंदे, हनुमंत कसबे, संदिप जाधव, लहु आडसुळ, शंकर खळे, प्रकाश गरदरे, अनिल गायकवाड, बापूसाहेब गायकवाड, धीरज सकट, अविनाश शिंदे, देवा भालके, सविता आव्हाड, जनाबाई वैरागे, दत्तु चव्हाण, तुकाराम शिंदे, सुरेश सकट, गणेश अवघडे, सुरेश जोगदंड, डॉ. धनंजय भिसे, अविनाश कांबीकर, सतिश, आबा मांढरे, बाबु पाटोळे, किशोर हातागळे, बाळासाहेब रसाळ, पांडुरंग लोखंडे, प्रसाद केसरे, कैलाश पाटोळे, बापू पवार, निलेश देवकुळे, दिपक लोखंडे, बापूसाहेब खंदारे, अमोल गोरखे, विठ्ठल कळसे, आशाताई शहाणे, राजू आवळे, मिरा आलाट, कमल घोलप आदी उपस्थित होते.

बैठकीत उपस्थितांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाच्या अनुषंगाने विविध सूचना मांडल्या. तसेच उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी उपस्थितांच्या सूचनांचा विचार करून प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button