पिंपरी चिंचवडराजकीय

सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीवर शिक्कामोर्तब

Spread the love

पिंपरी :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्राताई अजितदादा पवार यांची राज्यसभेत खासदार पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल चिंचवड विधानसभेचे नेते माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नेतृत्वात चिचंवड विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी भेटून सत्कार केला. पुणे जिल्ह्याला सुनेत्रा पवार यांच्या रूपाने तिसरी महिला खासदार मिळाली आहे.

 

 गेली २० वर्ष सुनेत्राताई पवार या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. काटेवाडी निर्मलग्राम करण्यापासून त्यांनी त्याच्या कार्यास सुरवात केली. एन्वहायमेंटल फोरमच्या माध्यमातून ओढा खोलीकरण, मोतीबिंदू, शस्त्रक्रिया शिबीर, वृक्षारोपण, कर्करोग जागृती, त्याच्यां ओढा खोलीकरण या उपक्रमामुळे अनेक गावे टँकरमुक्त केली. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरामुळे अनेकांना दृष्टी मिळाली. त्यांच्या याच जनतेशी संवाद आणि काम करण्याची पद्धत यामुळे त्यांना पक्षाने राज्यसभा खासदारपदी संधी दिली. यापुढे पक्षाच्या संघटनेत त्याच्या कार्याचे विशेषत: महिला संघटनेसाठी सुनेत्रा पवार यांचा उपयोग होणार आहे.

 आज पुण्यात सुनेत्रा पवार यांची निवासस्थानी भेट घेऊन चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी मा. विरोधी पक्षनेते नाना काटे, विधी समितीचे माजी अध्यक्ष संतोष कोकणे, पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस शिरीष आप्पा साठे, युवानेते शामभाऊ जगताप, तानाजी जवळकर, बाप्पु कातळे, सागर कोकणे, चंद्रकांत तापकीर, उमेश काटे, सचिन काळे, प्रशांत सपकाळ, पैलवान अजय कदम,विक्की साठे, आकाश साठे, निखिल घाडगे, प्रशांत देवकाते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button