पिंपरी चिंचवडशिरूर

तळवडे, चऱ्होली, दिघीतील प्रस्तावित कामे मार्गी

Spread the love

 

पिंपरी

सोसायटी, कॉलनीमधील अंतर्गत रस्ते, सभांडप आणि मंदिर सुशोभिकरणाच्या कामासह विविध ६ विकासकामांना आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने चालना देण्यात आली.

भोसरी विधानसभा मतदार संघातील तळवडे, चऱ्होली, मोशी आणि दिघी या भागातील विविध प्रस्तावित विकासकामांचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या ‘आमदार निधी’तून करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते.

रुपीनगर तळवडे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर सभामंडप, शिवशक्ती हाउसिंग सोसायटी, सहयोगनगर येथील श्रीगणेश मंदिर आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मरणार्थ चव्हाण वस्ती येथे सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच, दिघीतील श्रीराम कॉलनी, भारतमाता नगर, गणेश कॉलनी आणि डुडूळगाव येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजनही करण्यात आले.

रुपीनगर, तळवडे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजनन वाघामोडे, सचिव राजेंद्र सोनटक्के, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, दत्ता करे, कार्याध्यक्ष शिवाजी बिरके, खजिनदार संजय रुपनवर, सहखजिनदार संजय मोगे, नाना गावडे, सचिन नायकुडे, दयानंद सोनटक्के, विनोद नवसे, रमेश हिवरे, विश्वास सुरवदे, रामेश्वर बुदडकर यांच्यासह स्थानिक नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच, सहयोगनगर- तळवडे येथे शिवशक्ती मित्र मंडळाच्या पुढाकाराने गणेश मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते निलेश भालेकर, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, पांडाभाऊ भालेकर, रमेश भालेकर, शांताराम दगडू भालेकर, शिरीष उत्तेकर, प्रतिष्ठानचे विलास पवार, बालाजी राठोड, दत्तात्रय माने, किरण कुंभार, शंकर जगताप, मोहम्मद सय्यद, योगेश गव्हाणे, रजनीकांत राठोड, नितीन चव्हाण, नंदकुमार बोत्रे, श्रीकांत धायगुडे, दादा गोरड आदी उपस्थित होते.

तळवडे येथे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मरणार्थ चव्हाण वस्ती, तळवडे गावठाण येथे सुसज्ज समाज मंदिर उभारण्यात आले आहे. त्याच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक शांतराम भालेकर, सुरेश तात्या म्हेत्रे, धनंजय वर्णेकर, अस्मिता भालेकर, सोमनाथ मेमाणे, दत्तात्रय चव्हाण, किसन चव्हाण, बबन चव्हाण, सागर चव्हाण, कैलास चव्हाण, निलेश चव्हाण, आप्पा कांबळे, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

दिघी येथे गजानन महाराज नगरमधील श्रीराम कॉलनी क्रमांक १ तसेच, भारतमाता नगर गणेश कॉलनी नं. २ मध्ये प्रस्तावित रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर हिरानानी घुले, माजी नगरसेवक विकास डोळस, माजी शिक्षण समिती सभापती चेतन घुले, उदय गायकवाड, कुलदीप परांडे, मनोज गायकवाड, इंद्रजीत भोसले, संदीप कणसे, श्री. गुजर यांच्यासह परिसरातील माता-भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

भोसरी विधानसभा मतदार संघातील चऱ्होली येथे लक्ष्मीनारायणनगर येथील नागरिकांच्या मागणीनुसार नवीन जलवाहिनीचे काम सुरू करण्यात आले. यामुळे आगामी काळात पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर, माजी नगरसेविका सुवर्णा बुर्डे, स्वीकृत नगरसेवक अजित बोर्डे, भाऊ रासकर, सुनील काटे, गणेश तापकीर, कस्तुभ तापकीर,बाळासाहेब काटे, विनायक तापकीर, सोमनाथ घारे, सुनील शिंदे, अंकुश निवळकर, सुखदेव मोहिते, अंकुश चिकणे, देविदास साबळे, मुकुंद शेळके, गणेश माने, सागर चव्हाण, अमोल जाधव, संतोष गवते, श्री. वाणी यांच्यासह परिसरातील नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते.

अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्यादेवी होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांच्या नावाने होणारा सभामंडप हा अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांची कायम साक्ष देत राहील, असा विश्वास वाटतो. यासह सर्वसमावेशक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहे. मतदार संघातील नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे लांडगे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button