दहशतवाद विरोधी शाखा आणि भोसरी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली
बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळा... !

पिंपरी-चिंचवडमधील बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवर पुन्हा एकदा कारवाई केली आहे. पाच घुसखोर बांगलादेशींना अटक केली असून, त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पासपोर्ट, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला मिळाला आहे. भोसरी येथील शांतीनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
यासंदर्भात, आमदार महेश लांडगे म्हणाले की,
शांतीनगरमध्ये काही बांगलादेशी घुसखोर ओळख लपवून वास्तव्य करत होते. पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या दहशत विरोधी शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही धडक करावाई केली.
दहशतवाद विरोधी शाखा आणि भोसरी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असली, तरी शहरातील काही भागांमध्ये अनेक ठिकाणी बनावट आधारकार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला व पासपोर्टच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे भासवून घुसखोर वास्तव्य करीत आहेत. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने अशा घुसखोरांच्या वेळीच मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे.