पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रराजकीय

भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रवि लांडगे यांचा अपक्ष अर्ज दाखल

भय आणि भ्रष्टाचारमुक्त भोसरी मतदारसंघासाठी निवडणूक लढणार असल्याचे केले स्पष्ट

Spread the love

 

 

पिंपरी, दि.29(लोकजागृती )- भोसरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी मंगळवारी (दि. २९) मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. फक्त सत्ता, पैसा, पैशातून आलेल्या सत्तेचा गैरवापर, खोटी आश्वासने आणि दहशत व भ्रष्टाचाराने पिचलेल्या या जनतेनेच आता माझी निवडणूक हातात घेतली आहे. ही जनतेची आणि शिवसैनिकांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. भय आणि भ्रष्टाचारमुक्त भोसरी मतदारसंघ करण्यासाठी मी निवडणूक लढणार असल्याचे रवि लांडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगितले.

 

यावेळी शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रभारी अशोक वाळके, शहर समन्वयक कैलास नेवासकर, उपशहरप्रमुख नेताजी काशीद, माजी विरोधी पक्षनेते महादेव गव्हाणे, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप सावंत व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

रवि लांडगे म्हणाले, “गेल्या दहा वर्षात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा बकालपणा वाढला आहे. या मतदारसंघात दहा वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शेकडो कोटींच्या खर्चाची कामे झाली आहेत. या कामांमुळे भोसरी मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीत पुढारलेला असायला हवा होता. मात्र केवळ भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने केलेल्या या कामांमुळे भोसरीतील जनतेला आजही मुलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याचे वास्तव आहे. असे असेल तर मग खर्च झालेले कोट्यवधी रुपये गेले कुठे?, असा प्रश्न भोसरी मतदारसंघातील जनतेला पडलेला आहे. शेकडो कोटी रुपये खर्च करून केलेला विकास आज जनता शोधत आहे.

SOHAMPHOTOVISION

एकीकडे प्रचंड भ्रष्टाचार आणि दुसरीकडे दहशत असा दुहेरी मारा भोसरी मतदारसंघातील जनतेला सहन करावा लागत आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणाऱ्या या जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. कायम सत्तेत राहिलेलेच आता एकमेकांविरोधात लढणार आहेत. त्यांना ही जनता स्वीकारणार आहे. भोसरी मतदारसंघातील जनतेनेच आता ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे मी आता जनतेचा प्रतिनिधी म्हणून भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उतरलो आहे. ही निवडणूक जनतेच्या स्वाभिमानाची आणि भोसरी मतदारसंघाला भय व भ्रष्टाचारमुक्त करण्याची आहे. या निवडणुकीत जनता भोसरी मतदारसंघाचा स्वाभिमान जिवंत ठेवेले आणि भ्रष्टाचारी लोकांना कायमची घरी बसवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button