बोपखेल उड्डाण पुलाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी
शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी


बोपखेल उड्डाणपुलाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

पिंपरी चिंचवड शहरातील अनेक कामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यामध्ये बोपखेल येथील मुळा नदीवरील उड्डाणपुलाचा देखील समावेश होता. या बोपखेल उड्डाण पुलाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी कामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये पिंपरी ते पिंपळे सौदागर ला जोडणारा उड्डाण पूल, पंतप्रधान आवास योजनेतील आकुडी आणि पिंपरी मधील सदनिका, आंदा भामा आसखेड जलशुध्दीकरण प्रकल्प तसेच बोपखेल मुळा नदीवरील उड्डाण पुलाचे उद्द्घाटन याचा समावेश होता
वदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ही तमाम महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता आहे. त्यामुळे या उड्डाण पुलाला नाव दिल्यामुळे निश्चितच सर्वांसाठी आनंदाची बाब असेल, त्यामुळे लवकरात लवकर या मागणीचा विचार करून यावर कार्यवाही करावी, अशी मागणी केली. या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हा निर्णय घेतल्यास बाळासाहेबांच्या विचारांची आणि त्यांच्या योगदानाची आठवण कायम स्मरणात राहील. असे अॅड. सचिन ओसले यांनी म्हंटले आहे.
याप्रसंगी पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोन्हाळे, जेष्ठ शिवसैनिक मंगला ताई पुले, शिवदूत नाथाभाऊ खांडेभराड, विभागप्रमुख प्रदीप महाजन, गौरख नवघणे, राहुल देवकर, विभाग संघटक शंकर कुन्हाडकर, श्रीकांत चौधरी यांच्यासह शिवसैनिक गजानन धावडे, अमोल देवकर, संतोष नानक, आकाश शिरसाठ, नवनाथ शिंदे उपस्थित होते.