

‘बिग बॉस’ मराठीचा नवा सिझन सध्या घराघरात चांगलाच गाजतोय. नुकत्याच झालेल्या भागांत हा खेळ १०० ऐवजी अवघ्या ७० दिवसांतच संपणार असल्याचं ‘बिग बॉस’ यांनी जाहीर केलं. ६ ऑक्टोबरला ग्रॅन्ड फिनाले सोहळा रंगणार आहे. या नव्या निर्णयामुळे प्रेक्षकांमध्ये अनेक चर्चा रंगल्या आहेत.

बिग बॉस मराठी भारतात प्रसारित होणाऱ्या बिग बॉसच्या रिॲलिटी टेलिव्हिजन शोच्या मराठी आवृत्तीचा पाचवा सीझन आहे. 28 जुलै 2024 रोजी कलर्स मराठी आणि JioCinema वर भव्य प्रीमियर आयोजित करण्यात आला आहे.आता हा शो रंगत चालला आहे. या पुढे काय होणार कोण जिंकणार?
छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय असणारा कलर्स मराठीवरील कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी
गाजलेला शो आहे. खरं तर हा सीझन इतर चार सीझनपेक्षा जास्त गाजला. या सीझनमध्ये घरात कलाकारांनी कल्ला केला आणि बिग बॉसने त्यांना फैलावर घेतलं. कार्यक्रमाचा होस्ट बदलला आणि त्याचा कार्यक्रमाला फायदाच होताना दिसला. असं असताना प्रेक्षकांची कार्यक्रमाला पसंती मिळत असताना अचानक वाहिनीने कार्यक्रम अर्ध्यावरच संपवण्याचा निर्णय घेतला. आता त्यामागची काही महत्वाची कारणं समोर येत आहेत.
तुम्हाला काय वाटत ? याचं सगळ्यात मोठं कारण समोर येतंय ते म्हणजे हिंदी बिग बॉसची एंट्री. सलमान खान याच्या ‘बिग बॉस १८’ ला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षक हिंदी बिग बॉसकडे पाठ फिरवतील आणि त्यामुळे हिंदी बिग बॉसचा टीआरपी कमी होईल अशी भीती असल्याने हा सीझन वेळेआधीच संपवला असल्याचं बोललं जातंय. सलमानच्या बिग बॉसमुळे हा सीझन संपवला असल्याचं बोललं जातंय त्यामुळे नेटकरी देखील संतापले आहेत. हिंदीपुढे मराठी झुकलंय असं बोललं जातंय.